spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Narendra Modi मुळे व्यावसायिक भरभराट? Gautam Adani म्हणाले…

अदानी समूहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत अलिकडच्या वर्षांत रॉकेट वेगाने वाढ झाली आहे.

अदानी समूहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत अलिकडच्या वर्षांत रॉकेट वेगाने वाढ झाली आहे. अदानी ग्रुप (Adani Group) देशातील अग्रेसर औद्योगिक समुह… या औद्योगिक समुहाचं वार्षिक उत्पन्न मागच्या काही वर्षात इतकं वाढलं आहे की, गौतम अदानी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.पण त्यांच्या प्रगतीचा आलेख पाहता त्यांच्यावर काही आरोपही होतात. अदानी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Gautam Adani and Narendra Modi Relation) जवळचे असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येतो. मात्र अदानी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या या यशामागे अनेक नेते आणि सरकारे असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला यश कोणत्याही एका नेत्यामुळे मिळालेले नाही, पण याचे श्रेय गेल्या तीन दशकांत झालेल्या धोरणात्मक बदलांना जाते. इंडिया टुडे समुहाला दिलेल्या मुलाखतीत अदानी यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

त्या टीकाकारांबद्दल तुमचे म्हणणे काय आहे, जे तुमचे यश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आहे असे म्हणतात, असा सवाल त्यांना करण्यात आला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी एकाच राज्यातून आलो, त्यामुळे माझ्यावर असे निराधार आरोप करणे सोपे जाते. मात्र यात तथ्य नाही. मी माझा औद्योगिक प्रवास चार भागात सांगू इच्छितो. माझा औद्योगिक प्रवास राजीव गांधी पंतप्रधान असताना सुरू झाला. तेव्हा एक्झिम पॉलिसीचा विस्तार करायला सुरूवात केली. अनेक गोष्टी पहिल्यांदाच OGL लिस्टमध्ये आल्या.यातून माध्या व्यावसायाला गती मिळाली. जर राजीव गांधी पंरप्रधान नसते तर माझ्या व्यावसायिक प्रवासाची एवढी दमदार सुरुवात झाली नसती, असं अदानी म्हणालेत. “१९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणा लागू केल्या तेव्हा त्यांना दुसरी संधी मिळाली. इतर अनेकांसोबत त्यांनाही याचा फायदा झाला. त्यांच्या या नव्या आर्थिक धोरणामुळे माझ्यासह अनेकांना फायदा झाला. याबद्दल मी बऱ्याचदा बोललो आहे. या नव्या आर्थिक धोरणामुळे माझ्या व्यावसायाला गती मिळाली.

तिसरी संधी १९९५ मध्ये आली, जेव्हा केशुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्याआधी गुजरातमधील औद्योगिक विकास फक्त मुंबई ते दिल्ली NH-8 पर्यंत मर्यादित होता. त्यांनी किनारी भागावर लक्ष केंद्रित केले आणि मला माझे पहिले बंदर मुंद्रा येथे बांधण्याची संधी मिळाली,” तो या सगळ्या प्रवासातील मैलाचा दगड होता, असे त्यांनी नमूद केले. २००१ मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना चौथी संधी मिळाली. तेव्हा त्यांच्या धोरणांमुळे गुजरातमध्ये व्यावसायांना चालना मिळाली. त्यांच्या धोरणांनी गुजरातच्या आर्थिक विकासाला पंख दिले. आज मोदी देशात तेच करत आहेत. माझ्या विरोधात अशा गोष्टी बोलल्या जातात हे दुर्दैव आहे. हे सर्व निराधार आणि आपल्या प्रगतीच्या विरुद्ध पक्षपाती आहे. मोदींनी देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक विकासावरही ते भर देत असल्याचे अदानी म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत.ते देशाचे प्रमुख आहेत. आमची एक अग्रेसर उद्योग समुह आहे. मोदी आणि माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत. पण त्याचा माझ्या औद्योगिक प्रगतीशी तसा थेट संबंध नाही, असं अदानी म्हणाले.

“२०५० मध्ये भारत हा १६० कोटी तरुणांचा देश असेल, ज्यांचे सरासरी वय ३८ वर्षे असेल. भारतामध्ये जगातील सर्वात मोठा मध्यमवर्ग असेल आणि आपली अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन डॉलर्सची असेल. हे शतक खऱ्या अर्थाने भारताचे असेल,” असे गौतम अदानी यांनी नमूद केले. असे मानले जात आहे की पुढील वर्षी मंदी जगात दार ठोठावू शकते. याबाबत अदानी म्हणाले की, “२००८ मध्येही काही लोकांनी असे भाकीत केले होते पण भारताने ते चुकीचे सिद्ध केले. यावेळीही तेच होणार आहे. १ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प अशा चिंता दूर करण्यासाठी मदतीचा ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदींच्या धोरणांमुळे देशातील औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला असल्याचे अदानी म्हणाले. आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडियाने उत्पादन आणि व्यवसायासाठी नवीन संधी निर्माण केल्या आहेत आणि लाखो लोकांना रोजगार दिला आहे. स्वच्छ भारत, जन धन योजना, डीबीटी आणि आयुष्मान भारत यांसारख्या योजनांनी देशात आमूलाग्र बदल घडवून आणले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आपल्याला ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी ५८ वर्षे लागली. पुढच्या १२ वर्षांत आपण दोन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचलो आणि त्यानंतर पाच वर्षांत आपण तीन ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलो. पुढील दशकात, आपण दर १२ ते १८ महिन्यांमध्ये GDP मध्ये एक ट्रिलियन डॉलर्स जोडण्याच्या स्थितीत असू,” असे अदानी यांनी नमूद केले.

 

हे ही वाचा:

Twitter Down; लॅपटॉप, डेस्कटॉपवर लॉगिनही होत नाहीये, कारणही कळेना

महाराष्ट्रातील पारा घसरला तर देशातील काही ठिकाणी पावसाचा तडाखा, जाणून घ्या कोणत्या भागात काय स्थिती?

Rahul Gandhi चे लग्न? पहिल्यांदाच केलं लग्नाच्या मुद्द्यावर भाष्य, अखेर मनातली ‘ती’ गोष्ट आली ओठांवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss