गुजरातमध्ये मच्छू नदीत केबल पूल पाण्यात कोसळला; तीनशेहून अधिक नाकरीक पाण्यात

गुजरातमध्ये मच्छू नदीत केबल पूल पाण्यात कोसळला; तीनशेहून अधिक नाकरीक पाण्यात

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील केबल पूल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण नदीत पडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे ४०० ते ५०० लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. हा पूल खूप जुना असून काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. दिवसांपूर्वी ते सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता.

गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या पूलावर असणारे लोक नदीत पडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अद्याप कोणतीही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, केबल पूल कोसळल्यामुळे चारशे लोक नदीत बुडाले आहेत. मच्छू नदीत कोसळलेला पूल पाच दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. त्यानंतरही आज ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

बचाव पथकाने अनेकांना नदीतून वाचवले असून त्यांना रुग्णालयात पाठवले आहे. इतर लोकांचाही शोध सुरू आहे. सर्व लोकांना लवकरात लवकर नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सुट्टीचा दिवस असल्याने इथे खूप गर्दी होती. दुर्घटनेनंतर गुजरातचे मुख्यमंत्री बूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, “मोरबीमध्ये केबल पूल कोसळल्यामुळे दुर्घटना झाली आहे, याचं मला दु:ख वाटत आहे. प्रशासनाकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेहण्याचं काम सुरु आहे. जखमींवर तात्काळ उपचार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनासोबत संपर्कात असून बचावकार्य आणि दुर्घटनेची माहिती घेत आहे.”

हे ही वाचा :

चंद्रशेखर राव यांचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप; दिल्लीतील काही दलाल तेलंगणच्या स्वाभिमानाला

मुंबईतील हवेत व वातावरणात दुर्गंधी – जुही चावला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version