spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डव आणि ट्रेसमे शॅम्पूमुळे कर्करोगाचा धोका ! युनिलिव्हरने उत्पादने परत मागवली

केसांसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्राय शॅम्पूमुळे (dry shampoo) कॅन्सर होण्याचा धोका वाढत असल्याच्या बातम्या आल्यानंतर युनिलिव्हर (Unilever) कंपनी अडचणीत आली आहे. युनिलिव्हरने आपले अनेक एरोसोल ड्राय शॅम्पू उत्पादनं पार्ट मागवली आहेत. यामध्ये डव्ह, नेक्सस, ट्रेसमे आणि टिग्गी या शॅम्पू उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनांमध्ये कॅन्सरला कारणीभूत असलेले बेन्झिन (benzene) सापडल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

जॉन्सन अँड जॉन्सननंतर अशा प्रकारचा फटका बसलेली ही दुसरी अमेरिकन कंपनी आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार या शाम्पूमध्ये बेंझीन हे कॅन्सरची उत्पत्ती करणारे रसायन सापडले आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) नुसार ही उत्पादने ऑक्टोबर २०२१ च्या पूर्वी बनविण्यात आली होती. ही उत्पादने अमेरिकेतील प्रत्येक दुकानात वितरित करण्यात आली होती.यामध्ये डव्ह ड्राय शॅम्पू वॉल्यूम अँड फुलनेस, डव्ह ड्राय शॅम्पू कोकोनट, डव्ह ड्राय शॅम्पू फ्रेश अँड फ्लोरल, नेक्सस ड्राय शॅम्पू रिफ्रेशिंग मिस्ट, नेक्सस इनर्जी (inergy), फोम शॅम्पू अँड रिवाइव्ह, सुआव ड्राय शॅम्पू हेयर रीफ्रेशर, ट्रेस्मे ड्राय शॅम्पू वॉल्यूमायजिंग आणि बेड हेड रॉकाहोलिक डर्टी सीक्रेट ड्राय शॅम्पू.

ड्राय शॅम्पूचा उपयोग आपण आपले केस न भिजवता त्यांच्या सफाईसाठी करु शकतो. ड्राय शॅम्पू हे पावडर किंवा स्प्रेच्या स्वरुपात बाजारात मिळतं. स्टार्च किंवा अल्कोहोल मिश्रित हे शॅम्पू आपल्या केसांवर जमा झालेले तेल आणि ग्रीसची सफाई करतात आणि त्याला दाट करतात. काही ड्राय शॅम्पूमध्ये एरोसोल स्प्रे असतो. ड्राय शॅम्पूमध्येमध्ये बेन्झिन असल्याचं स्पष्ट झालं आहे. शॅम्पूच्या माध्यमातून बेन्झिन आपल्या शरीरात प्रवेश करु शकतं. त्यामुळे ब्लड कॅन्सर, ल्यूकेमिया आणि ब्लड डिसॉर्डचा धोका निर्माण होऊ शकतो. ज्या उत्पादनांमध्ये बेन्झिन सापडलं आहे, ती उत्पादनं माघार घेण्यात आली आहेत.

हे ही वाचा :

१३ जणांची कमिटी यावर निर्णय घेते; मनसे युतीबाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

Rashi Khanna : राशी खन्नाचा नवीन अंदाज पाहून चाहते झाले वेडे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss