spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी सीबाआयने मोठा खुलासा

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा करण्यात आलाय. दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच असल्याचं सीबीआयनं आपल्या अहवालातून स्पष्ट केलंय. गेल्या दोन वर्षात दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन राजकारण तापलं होतं. आरोप प्रत्यारोप केले जात होते. त्यानंतर अखेर हे प्रकरणी सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेलं. दरम्यान, आता सीबीआय तपासातून महत्त्वाची माहिती समोर आलीय. दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे सुशात सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाशी जोडलं जात होतं. मात्र दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय.

अहवालात नेमके काय?

अहवालात सीबीआयने म्हटले आहे की, तोल गेल्यानेच १४ व्या मजल्यावरून दिशा सालीयन खाली पडली. यातच तिचा मृत्यू झाला. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचेही सीबीआयने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 

Sanjay Raut : साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु…संजय राऊतांचा हल्लाबोल

दिशा सालियन ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर पाच दिवसांनी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली होती. भाजप आमदार नितेश राणे यांनी या दोन्ही मृत्यूंचा एकमेकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. मात्र सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्याच केली होती, असे सीबीआयच्या तपासाअंती स्पष्ट झाले आहे. तर, आता दिशा सालियन हिचा मृत्यूदेखील एक अपघात होता, असे सीबीआयच्या अहवालातून समोर आल आहे.

Happy Birthday Amruta Khanvilkar : ‘चंद्रा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकरसाठी आज खास दिवस

हा अहवाल समोर आणण्याआधी सीबीआयकडून सखोल तपास करण्यात आला होता. फॉरेन्सिक चाचण्यांचे अहवाल, चौकशी केलेल्यांच्या साक्षी, संपूर्ण घटनाक्रम, वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल या सगळ्याचा अभ्यास करण्यात आला होता. अखेर सीबीआय तपासाअंती या दोन्हीही स्वतंत्र घटना होत्या, हे समोर आलं आहे.

Maharashtra Karnataka Border Disputes : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न तापणार!

Latest Posts

Don't Miss