Tuesday, October 1, 2024

Latest Posts

Apple, Samsung ला 5G सॉफ्टवेअर अपग्रेडला “प्राधान्य” देण्याचे केंद्र सरकार देणार निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी अतिशय उच्च गती इंटरनेट सुविधा प्रदान करणारी 5G सेवा लॉन्च करताना म्हटले होते की ते एका नवीन युगाची सुरुवात तसेच मोठ्या संधींचे प्रतिनिधित्व करते.

केंद्र सरकार अॅपल, सॅमसंग आणि इतर मोबाईल फोन निर्मात्यांना 5G सपोर्ट करण्यासाठी सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यास सांगणार आहे. किंबहुना, या कंपन्यांनी अलीकडेच फोनचे अनेक मॉडेल्स लाँच केले आहेत, जे हाय-स्पीड सेवेसाठी तयार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी 5G सेवा सुरू केली. प्रमुख दूरसंचार ऑपरेटर रिलायन्स जिओने ही सेवा चार शहरांमध्ये आणि भारती एअरटेलने आठ शहरांमध्ये उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. पुढील वर्षी या सेवेचा विस्तार केला जाईल, असे दोन्ही कंपन्यांनी सांगितले होते. परंतु तीन उद्योग स्रोत आणि एअरटेलच्या वेबसाइटनुसार, Apple च्या iPhone मॉडेल्समध्ये, नवीनतम iPhone 14 आणि Samsung च्या अनेक फ्लॅगशिप फोन्ससह, भारतात 5G ला सपोर्ट करण्यासाठी सुसंगत सॉफ्टवेअर नाही.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारतातील दूरसंचार आणि आयटी विभागातील शीर्ष अधिकारी बुधवारी परदेशी कंपन्या Apple, Samsung, Vivo आणि Xiaomi तसेच देशांतर्गत दूरसंचार ऑपरेटर रिलायन्स, Airtel आणि Vodafone Idea यांच्यासोबत बैठक घेणार आहेत . ज्यामध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडबद्दल चर्चा होईल. अजेंडामध्ये हाय-स्पीड नेटवर्कला समर्थन देण्यासाठी सॉफ्टवेअर अपग्रेड करणे समाविष्ट असेल.

Apple Inc., Samsung Electronics, Vivo, Xiaomi Corp, तसेच तीन देशांतर्गत दूरसंचार ऑपरेटरकडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही टिप्पणी आलेली नाही. सरकारच्या आयटी आणि दूरसंचार विभागानेही अद्याप यावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी अतिशय उच्च गती इंटरनेट सुविधा प्रदान करणारी 5G सेवा लॉन्च करताना म्हटले होते की ते एका नवीन युगाची सुरुवात तसेच मोठ्या संधींचे प्रतिनिधित्व करते. पंतप्रधानांनी ‘इंडियन मोबाइल काँग्रेस’ २०२२ (IMC) मध्ये देशातील निवडक शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवांचे उद्घाटन केले. येत्या दोन वर्षांत या सेवेचा देशभरात विस्तार करण्याची योजना आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले होते.

हे ही वाचा:

Ram Setu Trailer: अंगावर शहारे आणणारा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Keral: अंधश्रद्धेपोटी डॉक्टर दाम्पत्याने दिला दोन महिलांचा बळी, भयानक घटनेचा पोलिसांनी केला खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss