Central Railway ने पूरस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर, सातारा आणि मिरज दरम्यान २८ अनारक्षित विशेष गाड्या केल्या जाहीर

Central Railway ने पूरस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर, सातारा आणि मिरज दरम्यान २८ अनारक्षित विशेष गाड्या केल्या जाहीर

मध्य रेल्वे (Central Railway) कोल्हापूर ते सातारा या भागातील पूरस्थिती लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाकडून विशेष सेवा चालविण्यात येणार आहे. या मध्ये कोल्हापूर ते सातारा १४ अनारक्षित विशेष सेवा आणि कोल्हापूर ते मिरजदरम्यान १४ अनारक्षित विशेष सेवा चालविण्यात येणार आहे, तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरता थांबाही देण्यात आला. कोल्हापूर-सातारा विभागादरम्यान अतिवृष्टी झाली आणि त्यानंतर आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एकूण २८ अनारक्षित विशेष सेवा चालवणार आहे. कोल्हापूर-सातारा अनारक्षित विशेष गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून ७ ऑगस्ट ते १३ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी ८.४० वाजता सुटेल आणि सातारा येथे त्याच दिवशी १.२५ वाजता पोहोचेल.

सातारा येथून ७ ऑगस्टपासून १३ ऑगस्टपर्यंत दररोज २.२० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे त्याच दिवशी ६.३५ वाजता पोहोचेल.

सदर गाड्या वळीवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, विश्रामबाग, सांगली, नंदरे, भिलवडी, किर्लोस्करवाडी, तकरी, भवानी नगर, शेणोली, कराड, शिरवडे, मसूर, तारगांव, रहिमतपूर आणि कोरेगांव कोल्हापूर-मिरज श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून ७ ऑगस्ट १३ ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी ८.१५ वाजता सुटेल.

भिलवडी आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर थांबा :

  1. म्हैसूर – अजमेर एक्स्प्रेस
  2. बेंगळुरू – गांधीधाम एक्स्प्रेस
  3. बेंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस
  4. बेंगळुरू – अजमेर एक्स्प्रेस
  5. बेंगळुरू – जोधपूर एक्स्प्रेस

कराड स्थानकावर थांबा :

कोल्हापूर-मिरज अनारक्षित विशेष (१४ सेवा) :

कोल्हापूर-सातारा अनारक्षित विशेष (१४ सेवा) :

हे ही वाचा :

आधी पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, मालदीव आणि आता बांग्लादेश ; चीनची धूर्त नीती भारतावर डाव साधण्याच्या प्रयत्नात?

“कोणीच स्वत:ला देवापेक्षा मोठं मानू नये”; बांग्लादेश प्रकरणावरून Uddhav Thackeray यांचा खडाजंगी टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version