spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतात ७० वर्षानंतर चित्यांचा गृहप्रवेश

सध्या भारत सरकार 'प्रोजेक्ट चित्ता' (Project Cheetah) या विशेष मोहीमेत व्यस्त आहे. भारतातून नामशेष झालेला चित्ता हा प्राणी पुन्हा आपल्या वातावरणात रुजावा,

सध्या भारत सरकार ‘प्रोजेक्ट चित्ता’ (Project Cheetah) या विशेष मोहीमेत व्यस्त आहे. भारतातून नामशेष झालेला चित्ता हा प्राणी पुन्हा आपल्या वातावरणात रुजावा, वाढावा यासाठी मोदी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे इंदिरा गांधींचं अर्धवट राहिलेलं स्वप्नच मोदी पूर्ण करतायत असंही त्यामुळे म्हणता येईल.

 तब्बल ७० वर्षांनी भारतात चित्त्याचं पुनरागमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसादिवशीच चित्यांना भारतात आणले जाणार आहे. १७ सप्टेंबरला नामिबियावरुन ८ चित्त्यांची पहिली बॅच भारतात दाखल होणार आहे आणि इतिहास पाहिला तर हे म्हणता येईल की देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं एक अर्धवट राहिलेलं स्वप्नच आता पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत. हरवलेला कोहिनूर परत मिळवणे हे कदाचित भारताचे अपूर्ण स्वप्न राहिल, परंतु देश चित्ता रीइंट्रोडक्शन प्रकल्पासारख्या दीर्घकालीन महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे – जे तुम्हाला लक्षात ठेवा, हिऱ्यांसारखे अनमोल आहे!

 भारतातून १९५२ मध्ये चित्ता नामशेष झाला. छत्तीसगढमध्ये शेवटच्या चित्याची शिकार झाली होती. त्यानंतर आशियात इराणमध्येच चित्त्याचं वास्तव्य होतं. १९७० मध्ये इंदिरा गांधींनी इराणहून भारतात चित्ते आणण्याची तयारी सुरु केली होती. आमचे काही वाघ तुम्हाला घ्या, त्या बदल्यात चित्ते आम्हाला द्या अशी ती ऑफर होती. इराणच्या शाहांशी इंदिरा गांधी यांनी करारावर सह्याही केल्या होत्या. पण इराणमध्ये वादळी सत्ताबदल झाला, शाहांची राजवट गेली नंतर हा प्रोजेक्ट बारगळलाच. त्यानंतर भारतात पुन्हा चित्ते आणण्यासाठीची हालचाल २००९ मध्ये सुरु झाली. यूपीए सरकारच्या काळात अनेक प्राणीमित्र, आंतरराष्ट्रीय संघटनांनी आफ्रिकेतून चित्ते आणता येतील का याबाबत हालचाली सुरु केल्या. मध्य प्रदेशचं कुनो नॅशनल पार्क, जैसलमेरचं शाहगड अशी काही ठिकाणंही निश्चित झाली. पण २०१२ मध्ये सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीनं चित्ते भारतात आणायला मनाई केली. भारतातल्या वाघांच्या पुनर्वसनाचं काम सुरु असतानाच तिथे चित्ते येणार, आफ्रिकन चित्त्यांना हे हवामान मानवेल का अशी काळजी सुप्रीम कोर्टाला वाटली. पण सात वर्षानंतर २०२० मध्ये सुप्रीम कोर्टानं ही बंदी उठवली. त्यानंतर प्रायोगिक तत्वावर आफ्रिकेतून चित्ते आणण्याची परवानगी भारताला मिळाली.

 भारतात आल्यानंतर या चित्त्यांची वाढ कशी होतेय हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे. जगात एकूण सात हजारच्या आसपास चित्ते आहेत. त्यापैकी तब्बल दोन तृतीयांश चित्ते हे एकट्या दक्षिण आफ्रिकेतच आढळतात. एकूण १६ चित्ते भारतात आणायचे आहेत, त्यापैकी ८ चित्य्यांची ही पहिली बॅच पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसांच्या दिवशी भारतात दाखल होणार आहे.

चित्तांबद्दल काही महत्त्वपूर्ण तथ्ये –

  • आठ चित्ते, पाच मादी आणि तीन नर १७ सप्टेंबर रोजी राजस्थानमधील जयपूर येथे आणले जातील.
  • नामिबियामधून सलग १६ तास प्रवास करु शकेल असं जंबोजेट यासाठी सज्ज आहे
  • आंतरखंडीय लिप्यंतरण प्रकल्पाचा भाग म्हणून एक खास सानुकूलित B747 जंबो जेट चित्ता आणणार आहे.
    त्यानंतर त्यांना जयपूरहून त्यांच्या नवीन घरी – मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो नॅशनल पार्कमध्ये – हेलिकॉप्टरमधून नेले जाईल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवशी या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडणार आहेत.
  • चित्ताला त्यांचा संपूर्ण हवाई प्रवास कालावधी रिकाम्या पोटी घालवावा लागेल, भारतीय वन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कारण लांबच्या प्रवासामुळे प्राण्यांमध्ये मळमळ सारखी भावना निर्माण होऊ शकते ज्यामुळे इतर आरोग्यविषयक गुंतागुंत होऊ शकते. तसेच प्रवासात चित्त्यांना उलट्या होतात, त्यामुळे त्यांना कमी त्रास व्हावा यासाठी हा प्रवास रात्रीचा करण्यात येणार आहे

  • चित्ता भारतात आणणाऱ्या विमानात मुख्य केबिनमध्ये पिंजरे सुरक्षित ठेवण्याची परवानगी देण्यासाठी सुधारित करण्यात आले आहे परंतु तरीही उड्डाण दरम्यान पशुवैद्यांना मांजरींना पूर्ण प्रवेश मिळू शकेल.
  • ज्या विमानात चित्ते प्रवास करतात ते विमान वाघाच्या प्रतिमेने रंगवण्यात आले आहे .
  • विमान हे १६ तासांपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम असलेले अल्ट्रा-लाँग रेंजचे जेट आहे आणि त्यामुळे ते इंधन भरण्यासाठी न थांबता थेट नामिबियापासून भारतापर्यंत उड्डाण करू शकते, ही चित्त्यांच्या कल्याणासाठी महत्त्वाची बाब आहे.
  • भारत सरकारने १९५२ मध्ये चित्ता नामशेष झाल्याचे घोषित केले.
  • भारत सरकारच्या प्रजाती पुनर्प्राप्ती कार्यक्रमांतर्गत, नामशेष झालेल्या प्रजाती त्यांच्या ऐतिहासिक नैसर्गिक अधिवासात पुनर्संचयित केल्या जातात.

Latest Posts

Don't Miss