दारुच्या नशेत असल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवलं?, विरोधकांचा गंभीर आरोप

दारुच्या नशेत असल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवलं?, विरोधकांचा गंभीर आरोप

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर विरोधकांकडून एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. दारूच्या नशेत असल्याने भगवंत मान यांना विमानातून चक्क खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून,अकाली दलानेयावरून निशाणा साधला आहे. मात्र भगवंत मान फ्रँकफूर्टहून दिल्लीला येत असताना शेवटच्या क्षणी त्यांचं विमान चुकलं आणि प्रवास एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे पंजाब सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी लगावला भाजपला टोला, म्हणाले…

भगवंत मान नुकतेच जर्मनीला गेले होते. सुखबीर बादल यांनी ट्विट केले की, ‘पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून खाली उतरवण्यात आले. सहप्रवाशांच्या हवाल्याने काही मीडिया रिपोर्ट्समध्ये हे दावे केले जात आहेत. मान यांच्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला. हा रिपोर्ट जगभरातील पंजाबींना लाजवेल असा आहे.’

हेही वाचा : 

Grampanchayat Election Result : सर्वाधिक ग्रामपंचायतींवर कमळ, तर शिंदे गट व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू

ते पुढे म्हणाले की, ‘धक्कादायक बाब म्हणजे पंजाब सरकार मुख्यमंत्र्यांबाबतच्या अशा रिपोर्टवर मौन बाळगून आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. पंजाबी आणि राष्ट्रीय अभिमानाची बाब असल्याने भारत सरकारने पावले उचलली पाहिजेत. जर मान यांना विमानातून खाली उतरवले असेल, तर भारत सरकारने यावर जर्मन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करायला हवी.’ दुसरीकडे ब्रिकम सिंह मजिठिया यांनीही या प्रकरणी भगवंत मान यांची खरडपट्टी काढली आहे.

आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग यांनी सांगितलं आहे की “ठरल्याप्रमाणे १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री परत आले. सोशल मीडियावरील सर्व रिपोर्ट प्रोपागंडा आहे. विदेशातून गुंतवणूक आणत असल्याने विरोधक त्यांच्यावर आरोप करत आहेत. तुम्ही विमान कंपनीकडेही तपशील मागू शकता”.

Dasara Melava : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्टाईल मध्ये भाषण करणार का?, ठाकरे प्लॅन बी मोडवर

Exit mobile version