spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार,आमदारांचा ९ एप्रिलला अयोध्या दौरा

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. आणि त्यानंतर राजकारणात जणू काही नाट्यमय प्रयोगांना सुरवातच झाली. सरकार स्थापन झाल्यापासून राजकारणात वेगवेगळ्या वादांना सुरवात झाली. राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर सत्तांतराच्या या नाट्यमय घडामोडींनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले होते.

महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. आणि त्यानंतर राजकारणात जणू काही नाट्यमय प्रयोगांना सुरवातच झाली. सरकार स्थापन झाल्यापासून राजकारणात वेगवेगळ्या वादांना सुरवात झाली. राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर सत्तांतराच्या या नाट्यमय घडामोडींनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ९ एप्रिल रोजी अयोध्या दौरा करून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहेत. आपल्या अयोध्या दौऱ्यावेळी (Ayodhya Visit) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची भेट देखील घेणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री, आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारी असा सर्व गोतावळा अयोध्येला जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना अयोध्येला जाण्यासाठी विशेष ट्रेनही बुक करण्यात आल्याचं खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या अयोध्या दौऱ्याबाबत माहिती देताना खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, ९ तारखेला अयोध्या दौरा असून आम्ही सर्व शिवसैनिक अयोध्येला जाणार आहोत त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुखांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी, भाजप युती अखंडित राहून चांगले कार्य आमच्या हातून घडो, तसेच राज्याचा विकास होवो यासाठी अयोध्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवारी नाशिकहुन विशेष ट्रेन जाणार सोडणार असल्याचं देखील सांगितले आहे.

शिंदे गटाचे शिवसैनिक ८ एप्रिलपासून अयोध्येत पोहोचणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिलला अयोध्येला पोहोचणार आहेत. त्यांनतर एकनाथ शिंदे यांच्या एकूणच अयोध्येच्या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तयार केलेल्या कार्यक्रमात रामलला, हनुमान गढी दर्शन पूजन, मंदिराच्या बांधकाम जागेची पाहणी, शरयू आरती आणि लक्ष्मण किल्ला मंदिरात संतांचे आशीर्वाद घेणे यांचा समावेश करण्यात आला आहे. संध्याकाळी शरयू आरती करून ते मुंबईला परततील.तसेच शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजित अडसूळ आणि राज्य प्रभारी विक्रम सिंह हे अयोध्येत पोहोचले आहेत.त्याचप्रमाणे ७ आणि ८ एप्रिल रोजी लखनौ ते अयोध्येपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी बॅनर्स (banner) आणि पोस्टर्स(posters)लावण्यात येणार आले आहेत.

हे ही वाचा : 

प्रिया बापटचे सोशल मीडियावरचे फोटो बघून चाहते घायाळ

वाढत्या वजनाला त्रासलेले आहात? उपाशीपोटी हे मॅजिक वॅाटर नक्की प्या

कोरोना घालतोय धुमाकूळ! उद्या सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची होणार बैठक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss