spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चिनी अभिनेता ली यिफेंगला वेश्या व्यवसायामुळे अटक; प्रमुख ब्रॅंड्सनी देखील तोडले संबंध

व्यक्तीने वेश्या व्यवसायांना अनेक वेळा भेट दिल्याचे कबूल केले आहे

द पायोनियर, मिस्टर सिक्स, द फाउंडिंग ऑफ अॅन आर्मी मधील भूमिकांसाठी ओळखला जाणारा प्रख्यात चीनी अभिनेता ली यिफेंग याला बीजिंग पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आणि त्याच्यावर वेश्याव्यवसाय केल्याचा आरोप केल्याने तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. बीजिंग म्युनिसिपल पब्लिक सिक्युरिटी ब्युरोच्या Weibo पोस्टनुसार, ३५ वर्षीय तरुणाने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

प्रादा आणि रेमी मार्टिनसह जागतिक ब्रँड्सनी चीनी सुपरस्टार ली यिफेंगशी संबंध तोडले आहेत, अभिनेत्याला वेश्यांची मागणी केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले होते. अलीकडेच कायदेशीर अडचणीत सापडलेल्या कलाकारांच्या पंक्तीत लीसुद्धा आता सामील झालाय आहे, कारण चीनच्या मनोरंजन उद्योगावर सरकारने कडक कारवाई केली आहे, “अराजक फॅन कल्चर” आणि सेलिब्रिटींचा अतिरेकांवर लगाम लावण्यासाठी सरकारने हे प्रयत्न सुरू केले आहेत.

रविवारी, ११ सप्टेंबर रोजी, बीजिंग पोलिसांनी ३५ वर्षीय अभिनेता लीला ताब्यात घेण्याबाबत अधिकृत निवेदन जारी केले होते. निवेदनात असे लिहिले आहे की, “व्यक्तीने वेश्या व्यवसायांना अनेक वेळा भेट दिल्याचे कबूल केले आहे आणि त्याला प्रशासकीय नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.” चिनी कायद्यानुसार, वेश्याव्यवसायाची मागणी करणे बेकायदेशीर आहे आणि सामान्यत: १० ते १५ दिवसांच्या दरम्यान गुन्हेगाराला प्रशासकीय ताब्यात घेतले जाते. गुन्हा किरकोळ असल्यास पाच दिवस किंवा त्यापेक्षा कमी दिवस शिक्षा होऊ शकते.

काही काळापूर्वी, लीच्या स्टुडिओने एका निवेदनाद्वारे व्यक्त केले होते की त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल काही इंटरनेट टिप्पण्या केवळ अफवा होत्या. लीने सुद्धा त्याला ६० दशलक्षाहून अधिक फॉलोवर्स असणाऱ्या त्याच्या Weibo ( चीनमधील ट्विटरसारखे अँप) अकाउंटवर पोस्ट करत सर्व अफवा खोडून काढल्या आणि व्यक्त केले की यामुळे त्यांचे भावनिक नुकसान झाले आणि त्यांच्या चालू व्यवसायांवरही याचा परिणाम झाला आहे.

हे ही वाचा:

ठाणे जिल्ह्यातील १४ गावांचा समावेश आता नवी मुंबई महापालिकेत, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर अधिसूचना प्रसिद्ध

‘मी तुझ्याशी बोलणार नाही’, असे शिक्षिकेने सांगताच चिमुकल्याने केलेले कृत्य पाहून व्हिडिओ होतोय वायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss