spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Watch Video, चक्क हरणांचा कळप विमानाला घेऊन आकाशात उडाला!

ख्रिस्तमस हा सण जगभरात साजरा केला जातो . कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २ वर्ष संपूर्ण जग हे दहशतीत होत. सणांवरती देखील विरजण पडले होते. परंतु आता २ वर्षाच्या कोंडीनंतर निर्बंध शिथिल झाले आहेत. जगभरात आता सगळे सण साजरे करू शकतो. तसेच ख्रिस्तमस हा सण जगभरात साजरा होतो. प्रत्येकजण ख्रिस्तमसची आतुरतेने वाट बघत असतो .या दोन वर्षाच्या महामारीनंतर ख्रिस्तमस हा जोरदार साजरा केला गेला. सेलिब्रिटी (celebrity), आर्टिस्ट (artist), ते सामान्य माणसे (comman people) या सगळ्यांनी ख्रिस्तमस (christmas) च्या विविध पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केल्या . तसेच भारतातील अनेक ठिकाणी ख्रिस्तमस दरम्यान सांस्कृतिक खेळांद्वारे सामाजिक जागृती देखील करण्यात येते. ख्रिस्तमस दरम्यान सोशल मीडिया अनेक व्हिडिओ आणि फोटोने भरलेलं असत. आणि अश्यातच सध्या एक व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Emirates (@emirates)

एक मजेशीर व्हिडीओ एमिरेट्स एअरलाइन्सने शेअर केला आहे, जो पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काही लोकांना धक्काही बसला आहे. एक आगळा वेगळा स्टंट ख्रिस्तमस दरम्यान करण्यात आला. एमिरेट्स या विमानकंपनीने २५ डिसेंबरला ख्रिस्तमस दिवशी विसम्यकारक स्टंट करून ख्रिस्तमस साजरा केला. त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओमध्ये विमानाला पुढे हरणांची जोड आहे. या व्हिडिओमध्ये हरणांचा कळप विमानासोबतच आकाशात उडताना दिसत आबे. हे दृश्य असे आहे की कोणीही ते पाहून हैराण होईल. काही लोकांना या व्हिडीओचे सत्य काय आहे? यावर विश्वासच बसत नाही, ‘हे खरे आहे का?’ असा प्रश्न विचारत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एमिरेट्स एअरलाइन्सच्या विमानाच्या वर सांताक्लॉजची एक मोठी टोपी घातली आहे. एक हरणांचा कळप ते विमान धावपट्टीवर खेचत आहेत आणि बघता बघता ते आकाशात उडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही सेकंदात हरणांचा कळप त्या विमानासह आकाशात उडतो. हे दृश्‍य असे आहे की, हरणांच्या कळपाने खरोखरच विमानासह आकाशात झेप घेतली आहे. हा व्हिडीओ खरोखरच जबरदस्त आहे.

त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘हे खरे आहे की खोटे?’, तर दुसऱ्या यूजरने ‘त्या फ्लाइटमध्ये मी देखील होतो’ असे गमतीने लिहिले आहे. हा शानदार व्हिडिओ एमिरेट्स एअरलाइन्सने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे, ‘कॅप्टन क्लॉज, उड्डाणासाठी परवानगीची विनंती करत आहे. अमिरातीकडून ख्रिसमसच्या शुभेच्छा. हा व्हिडीओ आतापर्यंत १२ दशलक्षाहून अधिक म्हणजेच १.२ कोटी वेळा पाहिला गेला आहे, तर ६ लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक देखील केले आहे.

हे ही वाचा : 

हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, ठाकरे गट होणार आक्रमक

चीन कोरोना रुग्ण संख्या लपवतोय ? कोरोना रुग्ण संख्या जाहीर न करण्याचा चीनचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss