CISCO : मेटा, अॅमेझॉन नंतर सिस्को करणार ५ टक्के कर्मचार्‍यांची कपात

CISCO :  मेटा, अॅमेझॉन नंतर सिस्को करणार ५ टक्के कर्मचार्‍यांची कपात

सध्या जगभरात आर्थिक मंदी चालू आहे या मंदीचा फटका आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पडताना दिसत आहे. आर्थिक मंदीमुळे आयटी क्षेत्रातील कम्पन्यांच गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.त्यामुळे आता या कंपन्यांनीकर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. जगातील सर्वात जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाच वापर करणाऱ्या कंपन्यांनी सुध्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. आता सिस्को या आयटी कंपनीतही नोकर कपात करण्यात येणार आहे. सिस्कोमधून पाच टक्के कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे.

अलीकडेच मेटा म्हणजेच फेसबुक ची पेरेंट कम्पनी ने तब्ब्ल ११,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्या पाठोपाठ ऍमेझॉन या कम्पनीने सुद्धा १०,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे त्यानंतर आता सिस्को सुद्धा कम्पनीतील ५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. सिस्को सिस्टीम्सने बुधवारी सांगितले की कंपनीने आपल्या काही व्यावसायिक युनिट्सला योग्य आकार दिल्याने कर्मचार्यांना काढून टाकण्याची आणि काही रिअल इस्टेट कमी करण्याची त्यांची योजना आहे. सिस्को त्यांची मर्यादित व्यवसायाची पुनर्रचना करणार आहे, जी कंपनीच्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओला योग्य आकार देण्यात मदत करेल पण त्याचा परिणाम सिस्कॉच्या सुमारे ५ टक्के कर्मचार्‍यांवरहोऊ शकेल.असे सिस्कोचे प्रवक्ते रॉबिन ब्लम यांनी एका मुलाखतीत सांगितल.

आयटी क्षेत्राशी संबंधित कंपन्यांवर मंदीचे परिणाम दिसत असून कंपन्यांमधून कर्मचारी कपातीला सुरुवात झाली आहे. आता सिस्को या आयटी कंपनीतही नोकर कपात करण्यात येणार आहे. सिस्कोमधून पाच टक्के कर्मचाऱ्यांचा रोजगार हिरावण्यात येणार आहे. सिस्को सिस्टीम्सने बुधवारी सांगितले की कंपनीने आपल्या काही व्यावसायिक युनिट्सला योग्य आकार दिल्याने कर्मचार्यांना काढून टाकण्याची आणि काही रिअल इस्टेट व्यवसाय कमी करण्याची त्यांची योजना आहे. तसेच सिस्कोचे अध्यक्ष आणि सीईओ चक रॉबिन्स यांनी सांगितल की ते कंपनीच्या विस्तृत पोर्टफोलिओला कमी प्राधान्य देत आहोत असे काही नाही पण ते विशिष्ट व्यवसायांना योग्य आकार देत आहोत.येत्या गुरुवारी नोकऱ्या कपातीबद्दल कर्मचाऱ्यांना सूचित केले जाईल, असे सिस्कोचे अध्यक्ष आणि सीईओ रॉबिन्स यांनी सांगितलं.त्यामुळे येत्या गुरुवारी सिस्कोमधील ४१०० कर्मचाऱ्यांची नोकरी हिरावली जाणार आहे .

Bigg Boss 16: शालिन, टीना आणि एमसी स्टॅन यांना बिग बॉसचा धक्का ; पहा काय झालं

सुनील शेट्टीच्या ‘File No 323’ आगामी चित्रपटावर व्यायसायिक मेहुल चोक्सीनी केला मान हानीचा दावा

Exit mobile version