Wednesday, September 25, 2024

Latest Posts

सिक्किममध्ये ढगफुटी, लष्कराचे २३ जवान बेपत्ता

देशभरात दांडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. काही भागात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या जोरदार चालू असलेल्या पावसामुळे सिक्कीम मध्ये ढगफुटी झाली आहे.

देशभरात दांडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. काही भागात अतिमुसळधार पाऊस पडत आहे. या जोरदार चालू असलेल्या पावसामुळे सिक्कीम मध्ये ढगफुटी झाली आहे. तसेच तीस्ता नदीला (Teesta River) पूर आला आहे. यामध्ये भारतीय लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत. सिक्किममधील प्रशासनाकडून जोरदार बचावकार्य आणि शोध सुरु आहे. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस (Sikkim Heavy Rain) सुरु असल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्खलित झाले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रशासानाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री हे प्रेमसिंग तमांग हे या घटनास्थाळाला भेट देणार आहेत. या दुर्घटनेमुळे काही भागातील घरांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. लष्कराचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावाला अचानक पूर आला. यामध्ये २३ जण अचानक बेपत्ता झाले आहेत. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीमच्या पाण्याची पातळी अचानक वाढत गेली. पाण्याची ही पातळी १५ ते २० फुटाने वाढत गेली. यामुळे लष्करच्या वाहनाची कोंडी झाली आणि सिंगतामजवळील बारडांग या परिसरात उभी असलेली लष्कराची वाहने वाहून गेली. यामध्ये २३ जवान आणि ४१ वाहने वाहून गेली आहेत.

भाजप नेते उग्येन त्सेरिंग ग्यात्सो भुतिया यांनी सांगितले सरकारी यंत्रणा बचावकार्यात गुंतली आहे. बेपत्ता नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी यंत्र सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यामध्ये अजूनतरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही नागरिक बेपत्ता आहेत त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss