spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM Arvind Kejriwal Resignation Announcement: अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा, येत्या दोन दिवसात मी…

दिल्लीचे मुख्यमंत्री असलेले अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसात मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असे अरविंद केजरीवाल यांनी घोषित केले आहे. पुढील दोन दिवसात विधिमंडळाच्या पक्षाची बैठक होईल, त्यामध्ये नवीन मुख्यमंत्र्याची निवड करण्यात येईल, असे सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.

मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांनी एक जाहीर सभा घेतली. या सभेदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी “मी दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार” अशी घोषणा केली. येत्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. त्यानंतर मी आणि मनीष सिसोदीया दोघेही नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. यासोबतच आम्ही गल्लोगल्ली मध्ये फिरून लोकांशी बोलू. जर जनतेला मी प्रामाणिक वाटत असेल तर त्यांनी मला निवडून द्यावे. मी जर बेईमान असेल तर जनतेने मला निवडून देऊ नये, असे अरविंद केजरीवाल यांनी नमूद केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २६ जून रोजी सीबीआयने अटक केली होती. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही अटक बेकायदेशीर ठरवत जामीन याचिका दाखल केली होती. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, आरोपपत्र दाखल झाले असल्याने आणि खटला नजीकच्या काळात पूर्ण होणार नसल्याने त्यांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही. अरविंद केजरीवाल यांना १० लाख रुपयांचा जामीन मुचलका भरावा लागला होता, त्यानंतर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला होता.अरविंद केजरीवाल हे जवळपास १७७ दिवसानंतर तुरूंगाच्या बाहेर आले. शिवाय त्यांना १० लाखाच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांसाठी जामीन देण्यात आला होता. प्रचार झाल्यानंतर त्यांना पुन्हा तरूंगात जावे लागले होते. आता त्यांना रितसर जामीन मिळाला आहे.

 

Latest Posts

Don't Miss