Cold Wave पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र थंडी तर दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात दाटले दाट धुके

दरम्यान, हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडणार आहे.

Cold Wave पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र थंडी तर दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात दाटले दाट धुके

देशभरातील हवामानात बरेच बदल होताना दिसत आहेत. अनेक राज्यांमध्ये कडाक्याची थंडी आहे, तर अनेक राज्यांमध्ये थंडीच्या लाटेसारखी स्थिती आहे. देशाच्या उत्तरेकडे आणि उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागात थंडी लक्षणीयरीत्या वाढत आहे. प्रचंड थंडीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार येत्या काही दिवसांत देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडणार आहे. वास्तविक, हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये तापमानात घट आणि दाट धुक्याबाबत इशारा दिला आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात हवामान खात्याने अनेक राज्यांमध्ये थंडीच्या लाटेबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच, IMD ने सांगितले की, पुढील २ दिवस थंडीची लाट राहील, त्यानंतर काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. देशातील विविध राज्यांबद्दल बोलायचे झाले तर देशाची राजधानी दिल्लीत आज सकाळी किमान तापमान ४ अंशांपर्यंत नोंदवले गेले.

‘या’ राज्यांमध्ये असेल कडाक्याची थंडी

याशिवाय पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, २७ डिसेंबरपर्यंत पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. दोन दिवसांनी धुके कमी होईल, असा आशावाद हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले की, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली आणि लगतच्या पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर-पश्चिम राजस्थानमधील बहुतांश केंद्रांमध्ये २४ तासात तापमानात ६ अंश सेल्सिअसपर्यंत घट नोंदवण्यात आली.

हे ही वाचा:

Mother Dairyने दुधाच्या दरात पाचव्यांदा केली वाढ, मंगळवारपासून २ रुपये/लिटरने महागणार दूध

Watch Video नवदांपत्याच्या Photoshoot मध्ये माकडाने लावली अचानक हजेरी,पत्नीची उडाली तारांबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version