३ दिवस ऑफिसमध्ये या नाहीतर कारवाईला सामोरे जा, TCS ने केला कर्मचाऱ्यांना मेल

कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाली आहे आणि आता आठवड्यातून ३ दिवस कार्यालयात येणे बंधनकारक आहे.

३ दिवस ऑफिसमध्ये या नाहीतर कारवाईला सामोरे जा, TCS ने केला कर्मचाऱ्यांना मेल

आयटी क्षेत्रातील मूनलायटिंगच्या चर्चेदरम्यान, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने घरून काम करण्याची सवय झालेल्या कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. टीसीएसने अंतर्गत मेलमध्ये म्हटले आहे की, कोरोनानंतर परिस्थिती सामान्य झाली आहे आणि आता आठवड्यातून ३ दिवस कार्यालयात येणे बंधनकारक आहे. त्याचे पालन न केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल.

आयटी कंपन्या कर्मचार्‍यांच्या मूनलायटिंगने, म्हणजेच एकाच वेळी इतर मार्गांनी पैसे कमवण्यामुळे नाराज आहेत. यामुळे विप्रोनेही ३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे..

काय आहे TCSच्या मेलमध्ये?

TCS ने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस ऑफिसमधून काम करण्यासाठी ईमेल पाठवले आहेत. ईमेलनुसार रोस्टर निश्चित करण्यात येणार असून त्यानुसार कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये काम करण्यासाठी यावे लागणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही टाइमलाइन दिली नसली तरी, अधिक तपशीलांसाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या एचआरशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.

यापूर्वी टीसीएसने कर्मचाऱ्यांना कार्यालयातून कामाला लावण्यासाठी सोशल मीडियावर प्रचार केला होता. TCS ने प्रचारात ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर केला होता.

हे ही वाचा:

निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यावर अजित पवारांनी केले वक्तव्य म्हणाले, बारामती कुणी गेले की ब्रेकिंग न्यूज…

शिवसेनेच्या विजयानंतर चंद्रकांत खैरेंना झाले अश्रू अनावर म्हणेल, ‘कोट्यवधी शिवसैनिकांचा विजय’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version