spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

व्यावसायिक एलपीजीच्या किंमतीत 91.5 रुपयांची घट तर एटीएफच्या दरात किरकोळ कपात

व्यावसायिक एलपीजीच्या किंमती दिल्लीत 1,885 रुपयांपर्यंत खाली आल्या; मुंबईत रु. 1,844; कोलकातामध्ये रु. 1,995; आणि चेन्नईमध्ये रु. 2,045 पर्यंत घसरल्या

गुरुवारी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणार्‍या व्यावसायिक एलपीजीच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय किंमती कमी झाल्यामुळे सिलिंडरमागे 91.5 रुपयांनी कपात करण्यात आली, या सुधारणांनंतर, व्यावसायिक एलपीजीच्या किंमती दिल्लीत 1,885 रुपयांपर्यंत खाली आल्या; मुंबईत रु. 1,844; कोलकातामध्ये रु. 1,995; आणि चेन्नईमध्ये रु. 2,045 पर्यंत घसरल्या आहेत. परंतु तेल कंपन्यांनी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत आणि वापरकर्ते दार पंधरा दिवसांनी ऑर्डर करू शकणार्‍या रिफिलवर मर्यादा लादण्यास सुरुवात केली आहे.

किंमतीतील या नव्या सुधारणांसह, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत 1,976 रुपयांऐवजी 1,885 रुपये होईल. 1 ऑगस्टलाही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्याआधी 6 जुलैला 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे दर प्रति युनिट 8.5 रुपयांनी कमी करण्यात आले होते.

सरकारने देशांतर्गत कच्च्या तेलावरील कर वाढवण्याव्यतिरिक्त डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील विंडफॉल नफा कर वाढवल्यानंतर एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) किंवा जेट इंधनाच्या किमती कमी केल्या आहेत. केंद्राने डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल नफा कर 7 रुपये प्रति लिटरवरून 13.5 रुपये प्रति लीटर केला आहे. एटीएफ निर्यातीवरील कर 2 रुपये प्रति लीटरवरून 9 रुपये प्रति लीटर झाला आहे, तर देशांतर्गत उत्पादित कच्च्या तेलावरील कर देखील 13,000 रुपये प्रति टन वरून 13,300 रुपये प्रति टन झाला आहे.

आजच्या सुधारणेनंतर, दिल्लीत देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी ATF किमती रु. 1,21,041.44/kl आहेत; मुंबईत रु. 1,20,001.74/kl; कोलकातामध्ये रु. 1,27,523.33/kl आणि चेन्नईमध्ये रु. 1,25,599.88/kl. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील देशांतर्गत विमान कंपन्यांसाठी, दिल्लीमध्ये ATF खर्च $1,154/kl, मुंबईत $1,151.48/kl; कोलकातामध्ये $1,193.39/kl आणि चेन्नईमध्ये $1,149.50/kl आहे.

दरम्यान, वाढता पुरवठा आणि चीनमधील कोविड-19 निर्बंधांमुळे जागतिक आर्थिक मंदीची भीती यामुळे जागतिक तेलाच्या किमती घसरल्या आहेत. ब्रेंट क्रूड 0.4 टक्क्यांनी घसरून $95.27 प्रति बॅरलवर आले, तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड फ्युचर्स 0.4 टक्क्यांनी घसरून $89.23 प्रति बॅरलवर आले.

घरगुती सिलिंडरच्या किमती मात्र स्थिर राहतील

6 जुलै रोजी 14.2 किलो वजनाच्या घरगुती लिक्विड पेट्रोलियम गॅस सिलिंडरच्या किंमती प्रति युनिट 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या. यापूर्वी, 19 मे 2022 रोजी घरगुती सिलिंडरच्या किंमतीत सुधारणा करण्यात आली होती.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सध्या घरगुती गॅस 1,053 रुपये प्रति युनिट दराने विकले जात आहेत. याशिवाय, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये ते अनुक्रमे 1,079 रुपये, 1,052.5 रुपये आणि 1,068.5 रुपयांना विकले जात आहेत. तसेच स्थानिक व्हॅटमुळे भिन्न राज्यातील गॅसचे दर हे भिन्न असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

आज लाँच होणार गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्धची पहिली भारतीय लस

ठाकरेंकडून बंद केलेली योजना फडणवीसांकडून सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss