काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या तापामुळे रुग्णालयामध्ये दाखल

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या तापामुळे रुग्णालयामध्ये दाखल

काँग्रेसच्या नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) याना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांना दिल्लीमधले सर गंगाराम रुग्णालयात (Sir Gangaram Hospital)दाखल करण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाने हि माहिती दिली आहे. सोनिया गांधी याना गुरुवारी २ मार्चला रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉ. अरुप बासू (Dr. Arup Basu) आणि त्यांची टीम सोनिया गांधी यांची देखरेख करत आहेत. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. सर गंगाराम रुग्णालय प्रशासनाने माहिती दिली आहे की काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी याना रुग्णालयामध्ये सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

सोनिया गांधी यांच्यावर सध्या विविध चाचण्या सुरु आहेत त्यांची आता प्रकृती स्थिर आहे असे रुग्णालयाने सांगितले आहे. सोनिया गांधी याना ताप आल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती ३ मार्चला देण्यात आली. सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सोनिया गांधी या सध्या ७६ वर्षांच्या आहेत. त्यांना गुरुवारी सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेव्हापासून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. चेस्ट मेडिसिन विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. अरुप बासू आणि डॉक्टरांची टीम यांच्यावर उपचार करत आहे.

जानेवारी महिन्यामध्ये त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते एक आठवडा त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि यावेळीच भारत जोडो यात्रा सोडून राहुल गांधी दिल्लीमध्ये दाखल झाले होते. याआधी सुद्धा म्हणजेच २०२२ च्या जुन महिन्यामध्ये त्यांची तब्येत खराब झाली होती. तेव्हा त्यांना कोरोनावरील उपचारासाठी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोना विषाणूचा त्यांना त्रास होत असल्यामुळे तेव्हा त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते आणि काही दिवसांनी त्यांना रुग्णालामधील डिस्चार्ज देण्यात आला होता.

हे ही वाचा :

Exclusive, कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या खळबळजनक निकालावर, जेष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि अभिजित ब्रम्हनातकर म्हणाले…

मार्च महिन्याच्या सुरवातीलाच महागाईचा तडाखा!, LPG सिलेंडर मध्ये ५० रुपयांची वाढ

पहाटेच्या शपथ विधीचं रहस्य अखेर अजित पवारांकडून उलगडणार, आत्मचरित्र लिहिन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version