Corona Guidelines कोरोना संदर्भात मोठी अपडेट समोर, विमानतळांवर आजपासून सुरू होणार कोरोना चाचणी

Corona Guidelines कोरोना संदर्भात मोठी अपडेट समोर, विमानतळांवर आजपासून सुरू होणार कोरोना चाचणी

चीन, जपानसह अनेक (China Coronavirus Outbreak) देशांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर आत भारतही सतर्क झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी (२१ डिसेंबर) देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या नवीन प्रकाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी देशातील कोरोनाची परिस्थिती आणि जगभरात कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या देखरेख, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी केलेल्या सज्जतेचा आढावा घेतल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. त्याचबरोबर नवीन प्रकारांचा मागोवा घेणे सुलभ करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सर्व कोविड-19 पॉझिटिव्ह प्रकरणांचे नमुने INSACOG प्रयोगशाळांना पाठवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा : 

आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने ४४ फोन

तसेच या बैठकीत भारतातील (Corona Updates) सध्याच्या स्थितीचाही अभ्यास करण्यात आला. दरम्यान, जगभरातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आजपासून विमानतळांवर रॅन्डम कोरोना चाचाणी केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

देशात सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. दररोज नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखी घटली आगे. देशात काल ११२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कोरोना रुग्णांचा आकडा लाखांवर पोहोचला होता. आतापर्यंत देशात ४ कोटी ४६ लाख ७६ हजार १९९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधील ४ कोटीहून अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.

Corona अजून संपलेला नाही, सतर्क राहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया

मुंबईमध्ये गेल्या २४ तासांत सात नवीन कोरोना (Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यामध्ये सहा आणि औरंगाबादमध्ये एक नवीन रुग्ण आढळला आहे. तर नागपूर, लातूर आणि अकोल्यामध्येही प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत.

Exit mobile version