Saturday, July 6, 2024

Latest Posts

कोरोना पुन्हा आला, गेल्या २४ तासांत देशात हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

देशातील कोरोना रुग्णांनाचा आलेख पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या सहा हजारांच्या पलिकडे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात बुधवारी दिवसभरात ६ हजार ४२२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. देशात मंगळवारी दिवसभरात ५ हजार १०८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बुधवारी रुग्णसंख्येत १ हजार ३१४ रुग्णांची वाढ झाली आहे.

वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने, आज युवासेना होणार राज्यभर आक्रमक

तर, महाराष्ट्रात ८८१ कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर ९६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्क्यांवर आले आहे.. तर राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. राज्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा १.८२ टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये ७९,५९,१३३ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा : 

Engineer’s Day 2022: भारतातील पहिली महिला इंजिनिअर कोण होती?

तर, दुसरीकडे देशभरात कोरोनाच्या आकडेवारीनुसार जगातून कोरोना महामारीचा अंत दिसू लागला आहे, असे विधान टेड्रोस यांनी केले आहे. जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामारीचा अंत करण्यासाठी संपूर्ण जग कधीही चांगल्या स्थितीत नव्हते. अद्यापही आपण त्या स्थितीत नाही. मात्र, आता या महामारीचा शेवट दृष्टीक्षेपात आहे.असे टेड्रोस यांनी केले.

डॉ. टेड्रोस म्हणाले की, गेल्या आठवड्यात जगभरातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या मार्च २०२० नंतरच्या साथीच्या आजाराती सर्वात कमी आहे. त्यामुळे दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या जागतिक महामारीच्या उद्रेकात हे एक महत्त्वपूर्ण वळण असू शकते असे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले आहे.

वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने, आज युवासेना होणार राज्यभर आक्रमक

Latest Posts

Don't Miss