कोरोनाने जगातील अनेक देशांमध्ये वाढला तणाव, भारताला देण्यात आला सतर्कतेचा इशारा

भारतातील संभाव्य धोका पाहता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे.

कोरोनाने जगातील अनेक देशांमध्ये वाढला तणाव, भारताला देण्यात आला सतर्कतेचा इशारा

पुन्हा वाढणार कोरोनाचा धोका!

जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, भारतातील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, गेल्या २४ तासांत कोरोनाचे केवळ १३१ रुग्ण आढळले आहेत. सक्रिय प्रकरणांची संख्याही कमी होत आहे. ताज्या अपडेटनुसार, देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या ३,४०८ वर आली आहे. यापूर्वी, देशात एकूण ३ हजार ४९० सक्रिय प्रकरणे होती, जी मार्च २०२० नंतरची सर्वात कमी संख्या आहे.

भारतातील संभाव्य धोका पाहता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या पत्रात असे म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या सर्व पॉझिटिव्ह प्रकरणांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत, जेणेकरून कोरोना विषाणूचे प्रकार शोधता येतील. त्याचबरोबर लसीकरणाचा आकडा २२० कोटींच्या पुढे गेला आहे. ही संख्या कोरोना विषाणूच्या सर्व उपलब्ध लसींच्या पहिल्या, द्वितीय आणि प्रीक्शन डोसचा समावेश करते.

आज बैठक होणार केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया देशातील कोविड-१९ च्या परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांसोबत बैठक घेणार आहेत. आरोग्य मंत्रालयाने देशात आतापर्यंत नोंदवलेल्या कोरोना प्रकरणांची आकडेवारीही दिली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतातील कोविड-१९ ची संख्या४,४६,७६,३३० वर पोहोचली आहे, म्हणजेच आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसची इतकी प्रकरणे नोंदली गेली आहेत.

‘मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आवश्यक’

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे या पत्रात म्हटले आहे. यासोबतच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

Coronavirus चीनमध्ये कोरोना वाढण्यामागचे प्रमुख कारण आले समोर, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा प्रकार

Coronavirus in China चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक ! व्हिडीओ होतोय व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version