Corona अजून संपलेला नाही, सतर्क राहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया

चीनसह (China), जपान (Japan) आणि अमेरिकेत कोरोनाचा (Covid 19) विळखा वाढत चालला आहे. यावरूनच भारतही (India ) आता सतर्क झाला आहे.

Corona अजून संपलेला नाही, सतर्क राहा, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया

Covid 19 Cases In India : चीनसह (China), जपान (Japan) आणि अमेरिकेत कोरोनाचा (Covid 19) विळखा वाढत चालला आहे. यावरूनच भारतही (India ) आता सतर्क झाला आहे. देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. याबाबत त्यांनी स्वता ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ज्यामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. याआधी मांडविया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) पत्र लिहून भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आता स्थगित करण्याचा विचार केला पाहिजे, यामध्ये कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले जात नाही, असे म्हटले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांवर पाळत ठेवण्याबाबत चर्चा झाली. परदेशातून येणाऱ्या लोकांची काटेकोरपणे तपासणी करा आणि कोरोनाचा नवीन प्रकार ओळखण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा द्या, असेही सांगण्यात आले. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी परदेशातून परतणाऱ्या भारतीयांसाठी प्रोटोकॉल तयार करावा, यावरही बैठकीत भर देण्यात आला. कोरोना सारखी लक्षणे आढळल्यास त्यांचे नमुने त्वरित जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र पाठवण्यात आले होते. ज्यामध्ये भारत जोडो यात्रेचा उल्लेख करण्यात आला होता. कोविड प्रोटोकॉलचे पालन करता आले नाही तर ‘भारत जोडो यात्रा’ स्थगित करण्याचा विचार करावा, असे आवाहन मांडविया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केले.

आता त्यांनी आपल्या ट्विटमध्ये उच्चस्तरीय बैठकीचा संदर्भ देत लिहिले आहे की, “जगातील अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढणारे कोरोनाचे (Covid 19) रुग्ण पाहता अधिकारी आणि तज्ज्ञांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. कोरोना संपलेला नाही. मी सर्वांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सतत काम करावे, असे निर्देश दिले असून आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत.” या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी कोरोनाबद्दल (Covid 19) माहिती देताना सांगितले की, केवळ २७-२८% लोकांनी प्रतिबंधात्मक डोस घेतला आहे. आम्ही इतरांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सावधगिरीचे उपाय करण्याचे आवाहन करतो. सावधगिरीचा डोस अनिवार्य आहे आणि सर्वांसाठी निर्धारित आहे.

हे ही वाचा : 

वर्षाच्या सुरुवातीलाच मुबईकरांचा खिसा होणार रिकामा !, वीजबिल आणि पाणीपट्टीत होणार ‘ इतक्या’ टक्यांनी वाढ

Coronavirus चीनमध्ये कोरोना वाढण्यामागचे प्रमुख कारण आले समोर, जाणून घ्या किती धोकादायक आहे हा प्रकार

राज्यातील शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर,पुरेसा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा दूर करण्याची अजित पवार यांची मागणी

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version