spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Corona virus चीनमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येचं संपूर्ण जगापुढे टेन्शन

चीनमध्ये झीरो-कोविड पॉलिसीच्या ( COVID-19) विरोधात निदर्शने झाल्यानंतर सरकारने देशात शिथिलता आणली आणि लॉकडाऊन हटवला आहे. परंतु आता तेथील परिस्थिती आणखी बिकट होताना दिसत आहे. रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची गर्दी झाली आहे. एवढेच नाही तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होत असलायची माहिती समोर येत आहे. काही डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असूनही रुग्णांवर उपचार करत आहेत. २ वर्षांपासून कडक कोरोना नियम लागू करणाऱ्या चीन सरकारने यू-टर्न घेतला आहे. आता अधिकारी म्हणतात की, कोरोनाचा ओमिक्रॉन प्रकार धोकादायक नाही. सरकारसुद्धा लोकांना सेल्फ केअरबद्दल (Self care) सांगत आहे. म्हणजेच कोरोनाला घाबरण्याची गरज नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. लोकांनी स्वतःची काळजी घेतल्यास संसर्ग टाळता येऊ शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : 

Vijay Diwas 2022 १९७१ साली भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला,१४ दिवसाच्या युद्धानंतर पाकिस्तान आलं शरण

चीनच्या सरकारने लॉकडाउन मागे घेतल्याचा भूर्दंड आता आरोग्य कर्मचाऱ्यांना भोगावा लागत आहे. रुग्णालयात कोरोनाबाधितांची रांग लागली आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील बाधा होत आहे. शिचुआन प्रांतातील स्थिती खराब असून तेथे दररोज ७०० ते ८०० जणांना तापेची समस्या होत आहे. चेंगडू शहरातील रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेने आपण दररोज २०० रुग्णांवर उपचार करत असल्याचे समोर येत आहे, तर एका वैद्यकीय कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, कोरोना पॉझिटिव्ह असतानाही आमच्याकडून काम करून घेतले जात आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

Copper vessel : हिवाळयात ‘या’ धातूच्या भांडयात पाणी पिणे चांगले की वाईट?

वैज्ञानिकांच्या अहवालानुसार, चीनमध्ये परत कठोर निर्बंध आणि लॉकडाऊन (china lockdown) लागू करण्याची आवश्यकता आहे. येत्या वर्षात जानेवारी २०२३ चीनमधील लॉकडाऊन हटवण्यात येऊ नये. कोरोना लसीकरणात वाढ आणि अँटीव्हायरल औषधांचा पुरेसा साठा यामुळे कोरोना मृत्यू कमी करण्यात मदत होईल. यामुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २६ टक्क्यांनी कमी होईल.

fatigue कामाच्या धावपळीत थकवा जाणवत असेल, तर ‘या’ गोष्टी सोबत ठेवा

Latest Posts

Don't Miss