देशात पुन्हा एकदा कोरोनाचं टेन्शन! गेल्या २४ तासांत केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू तर २९२ रुग्णांची नोंद

देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

देशात पुन्हा एकदा कोरोनाचं टेन्शन! गेल्या २४ तासांत केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू तर २९२ रुग्णांची नोंद

देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. केरळ राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मंगळवारी १९ डिसेंबरला २९२ कोविडबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच आता केरळमध्ये २०४१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. एकाच दिवसात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने नागरिकांना न घाबरण्याचे आणि सतर्क राहण्याचे आव्हान दिले आहे.

गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसने (Coronavirus Updates) पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि कोरोनाच्या (Covid-19) संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट (New Subvariant of Covid) भारतात (India Corona Update) आल्याने सरकारच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिले प्रकरण केरळमध्ये (Kerala) आढळून आलं आहे. JN.1 व्हेरिएंटचे पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्यास सांगितले आहे. भारतात कोविड-१९ च्या JN.1 व्हेरिएंटचा पहिला बाधित ८ डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवले गेले. यापूर्वी, तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका प्रवाशाला सिंगापूरमध्ये JN.1 प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले होते. इन्फ्लूएंझा-सदृश आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) च्या जिल्हा-आधारित प्रकरणांची तपासणी आणि प्रकरणे लवकर शोधण्यासाठी सर्व आरोग्य सुविधांबाबत नियमितपणे अहवाल देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य खात्याने दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गाचे (Maharashtra Coronavirus Updates) ११ नवीन रुग्ण वाढले आहेत.

आतापर्यंत ३५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २७ फक्त मुंबईत (Mumbai Coronavirus) सापडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत २७ , पुण्यात २ आणि कोल्हापुरात एक रुग्ण सक्रिय आहे. आयसोलेशनमध्ये २३ रुग्ण आहेत. मंगळवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबईत कोरोनाचे २७ रुग्ण आढळले आहेत. तर, ठाणे जिल्ह्यात ५ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात २ आणि कोल्हापुरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

Exit mobile version