Cyclone Biparjoy:हवामान खात्याकडून भारताच्या किनारपट्टीला बिपरजॉयचा धोका

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्यापट्ट्यामुळे १० ते ६ जून दरम्यान 'बिपरजॉय' चक्रीवादळ निर्माण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून 'बिपरजॉय' चक्रीवादळ हे चर्चेचा विषय ठरलं आहे.

Cyclone Biparjoy:हवामान खात्याकडून भारताच्या किनारपट्टीला बिपरजॉयचा धोका

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्यापट्ट्यामुळे १० ते ६ जून दरम्यान ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ निर्माण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे चर्चेचा विषय ठरलं आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या या वादळामुळे भारतातील मॉन्सून सुद्धा लांबण्याची शक्यता होती. सध्या भारतात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy) मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येत आहे. या चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये तीव्र वारे वाहत आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढून अत्यंत धोकादायक झाली आहे. हवामानखात्याने दिलेल्या माहिती नुसार ‘बिपरजॉय’ वादळाने आपला मार्ग बदलला असून भारताला मोठा धोका निर्माण झाला आहे.

हवामान विभागाने ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे गुजरात आणि पाकिस्तान च्या किनारपट्टीवर येऊन धडकण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. यामुळे किनारपट्टीतील भागांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळ हे जास्त काळ टिकणारे चक्रीवादळ आहे. मोखा चक्रीवादळानंतरचे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचे बोलले जात आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे भारतातील गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने बिपरजॉय चक्रीवादळ मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान ओलांडण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे. तसेच हे वादळ १५ जून रोजी १२५-१३५ किमी वाऱ्याच्यावेगासह धडकणार असल्याची माहिती सुद्धा हवामान खात्याने दिली आहे. परंतु बिपरजॉय चक्रीवादळ हे नेमके कुठे धडकणार याची स्पष्टता अद्याप ही हवामान खात्याने दिलेली नाही.

हे ही वाचा:

आजचे राशिभविष्य, १२ जून २०२३, चांगल्या गोष्टी घडतील…

दररोज प्या ८ ग्लास पाणी ; शरीरासाठी आवश्यक

पालघर जिल्ह्यात वादळाचा तडाखा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

 

Exit mobile version