तमिळनाडूला चक्रीवादळाचा तडाखा, ४ जणांचा मृत्यू

तमिळनाडूला चक्रीवादळाचा तडाखा, ४ जणांचा मृत्यू

मंदोस चक्रीवादळ (Cyclone Mandos) शुक्रवारी रात्री उशिरा ताशी ७५ किमी वेगाने किनारपट्टी ओलांडल्यानंतर तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) चार जणांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळ आता खोल दबावात कमकुवत झाले आहे. चक्रीवादळानं समुद्र किनाऱ्यावर तांडव घातलं. चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये चार जणांचा मृत्यू झालाय.

मंदोस चक्रीवादळ शनिवारी पहाटे दोन वाजता चेन्नईच्या (Chennai) किनारपट्टीवर धडकलं. चक्रीवादळानं समुद्र किनाऱ्यावर तांडव घातलं. चक्रीवादळामुळे तामिळनाडूमध्ये चार जणांचा मृत्यू झालाय. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूसह तीन राज्यात रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आलाय. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तसेच मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये मंदोस चक्रीवादळामुळे ११५ मिमी पाऊस झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. एम के स्टॅलिन म्हणाले की, चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागांवर आमचं लक्ष आहे. नुकसानाचे मुल्यमापन केले जात आहे. मदतकार्य वेगानं सुरु असून मिळालेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालाय. ८९ जनावरांचा (animals) मृत्यू झालाय. तर यामुळे १५१ घरांचं नुकसान झालेय.

मुख्यमंत्री एम के स्टॅलिन (MK Stalin) म्हणाले की, ‘कासीमेडू येथे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं केलेल्या तयारीमुळे मोठी हानी झाली नाही. उन्नत योजनामुळे कोणत्याही आपत्तीचे व्यवस्थापन करता येते, हे आम्ही सिद्ध केले आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागातून २०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ९००० जणांना अन्न पुरवलेय. त्याशिवाय चक्रीवादळामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी १५ हजार झाडांची छाटनी करण्यात आली आहे. मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये राष्ट्रीय आपत्ती दलाची तैयार करण्यात आले आहे. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनने सर्व पार्क आणि खेळाची मैदानं बंद करण्याचा आदेश दिलाय. मंदोस चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विलाप्पुरम, कुड्डालोर, रानीपेट, वेल्लोर, तिरुवल्लूरसह तामिळनाडूच्या १७ जिल्ह्यांमध्ये शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये आयएमडीने रेड अलर्ट जारी केला आहे.

हे ही वाचा : 

Nagpur ते Shirdi ५ तासांत, …असा असेल समृद्धी महामार्गाचा प्रवास | Samrudhi Mahamarg Route |

Ind vs Ban : भारताचा बांगलादेशवर २२७ धावांनी दणदणीत विजय

शाईफेकनंतर चंद्रकांत पाटलांनी दिली पहिली पतिक्रिया

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version