DA Hike : ऐन नवरात्रीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदींची भेट

केंद्र सरकारने एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना दसरा-दिवाळीची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा (DA Hike) निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली.

DA Hike : ऐन नवरात्रीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदींची भेट

केंद्र सरकारने एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना दसरा-दिवाळीची भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा (DA Hike) निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे महागाई भत्ता आता ३४ टक्क्यांहून वाढून आता ३८ टक्के झाला आहे.

मोदी सरकारने १ कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना नवरात्रीकाळात मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे हा भत्ता आता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ जुलै ते डिसेंबर २०२२ पर्यंत वैध असेल. कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना आता ३८ टक्के प्रमाणे महागाई भत्ता मिळणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे असणार आहे.

सध्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३४ टक्क्याने महागाई भत्ता दिला जात आहे. परंतु, महागाईचा भडका लक्षात घेता सरकारने त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा भत्ता ३४ टक्क्यांवरून ३८ टक्क्यांवर गेला आहे. या नव्या निर्णयानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासह नवीन महागाई भत्त्याची संपूर्ण रक्कम दिली जाणार आहे. याशिवाय ऑक्‍टोबर महिन्यात मागील तीन महिन्यांची सर्व थकबाकीही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. महागाई भत्त्यात वाढ केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहे. आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

हे ही वाचा:

Ranbir Kapoor Birthday : रणबीर आणि कतरिनाचे परदेशातील खाजगी फोटो झाले व्हायरल, सोशल मीडियावर चर्चा

अनाथांचा नाथ एकनाथ म्हणतं थेट मुयख्यमंत्र्यांना पोलीस निरीक्षकाचं पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version