“दाऊद इब्राहिमने केलं दुसरं लग्न, हसीना पारकरच्या मुलाचा मोठा खुलासा

“दाऊद इब्राहिमने केलं दुसरं लग्न, हसीना पारकरच्या मुलाचा मोठा खुलासा

दाऊदची बहीण हसीना पारकर (Haseena Parkar) हीचा मुलगा आणि दाऊदचा भाचा अलीशाह पारकर (Alisha Parker) हा सध्या NIA च्या ताब्यात आहे. त्याच्या चौकशीनंतर दाऊदबद्दल अनेक मोठे खुलासे समोर आले आहेत. मोस्ट वाँटेड यादीतील दहशतवादी असलेला दाऊद इब्राहीम (Dawood Ibrahim) हा कराची मधील डिफेन्स परिसरात असलेल्या अब्दुल्ला गाझी बाबा दर्गाहच्या नजीक राहत असल्याची माहिती अलीशाह याने एनआयएला दिली आहे. तसेच दाऊदने दुसरे लग्न केले असून त्याची नवी पत्नी ही पाकिस्तानमधल्या (Pakistan) पठाणी कुटुंबातून येत असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे एका अर्थाने आता दाऊद हा पाकिस्तानचा जावई झाल्याचे कळते.

अली शाहचा दावा आहे की, दाऊदची पहिली पत्नी महजबीन शेख व्हॉट्सअॅप कॉलच्या (WhatsApp call) माध्यमातून परिवाराच्या संपर्कात आहे. हसीना पारकरच्या मुलाने एएनआयने तपासात दाऊदच्या सध्याच्या ठिकाणाविषयी देखील सांगितले. अली शाह म्हणाला, सध्या दाऊद पाकिस्तानातील कराचीमध्ये (Karachi) आहे. कराचीमध्ये दाऊद इब्राहिम कासकर, हाजी अनीस उर्फ अनिस इब्राहिम शेख आणि मुमताज रहिम फाकी आपल्या परिवारासह अब्दुल्ला गाजी बाबा दर्गाच्या मागे डिफेन्स कॉलनी, कराची येथे राहतो.

मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरचा जन्म डिसेंबर १९५५ मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्याचे वडील इब्राहिम कासकर हे पोलीस हवालदार होते. नंतर दाऊद इब्राहिमचे कुटुंब मुंबईतील डोंगरी भागात स्थायिक झाले. ७० च्या दशकात मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे नाव वेगाने पुढे येऊ लागले. पूर्वी तो हाजी मस्तान गँगमध्ये काम करायचा. तिथे राहत असताना त्याचा प्रभाव वाढू लागला. लोक त्याच्या टोळीला डी-कंपनी म्हणू लागले. त्याला त्याचे प्रमुख मानले जात असे. १९९० मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा तो सूत्रधार होता. बॉम्बस्फोट झाल्यानंतर तो भारतातून पसार झाला. १९९० पासून तो पाकिस्तानात आहे.

हे ही वाचा:

संयुक्त राष्ट्रांनी पाकिस्तानचे अब्दुल रहमान मक्की यांना जागतिक दहशतवादी म्हणून केले घोषित

अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या अडचणीत वाढ, तहसीलदारांने बजावली ‘या’ प्रकरणात थेट नोटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version