Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

एक कॅब खरोखऱ अस्तित्वात आहे. ही एक दिल्लीतील कॅब असून या कॅबमध्ये सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातात.सध्या सोशल मीडियावर (social media) एका कॅब ड्राइव्हरची फार चर्चा होत आहे.'अब्दुल कादिर' हे या कॅबड्रायवरचे नाव असून त्याच्या कॅबमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील.

Delhi Cab Driver, एकाच टँक्सीमध्ये WiFi पासून Snacks सह सर्व सुविधा उपलब्ध

आपला प्रवास सुखकर करण्यासाठी आपल्याला एका चांगल्या कॅब ड्रायरची गरज असते. कॅब जर का खराब असली किंवा कॅबचा ड्रायवर चांगला नसला की प्रवासात मज्जा राहत नाही. तसेच कॅबमध्ये असलेल्या अनेक गोष्टी काही कॅब ड्राइवर्स वापरू देत नाही किंवा वापरू दिले तर त्याचे दुप्पट पैसे आकारले जातात जसे की AC. तसेच तुम्हाला तुमच्या सर्व सोईविधा एकाच कॅबमध्ये मिळाल्या तर ? विचार करा तुम्हाला कशाचीही कमी भासणार नाही. अशी एक कॅब खरोखऱ अस्तित्वात आहे. ही एक दिल्लीतील कॅब असून या कॅबमध्ये सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातात.

सध्या सोशल मीडियावर (social media) एका कॅब ड्राइव्हरची फार चर्चा होत आहे.’अब्दुल कादिर’ हे या कॅबड्रायवरचे नाव असून त्याच्या कॅबमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील. वायफाय (WIFI) ,वर्तमानपत्रे आणि खाण्या-पिण्याची सुविधा तुम्हाला या कॅबमध्ये मिळेल. श्याम लाल यादव (@RTIExpress) यांनी २६ जून रोजी कॅबचे फोटो ट्विटरवर (twitter) पोस्ट केले होते. या फोटोत त्यांनी लिहिले की, आज मी ‘उबर’ वापरत आहे. मला एक अप्रतिम ड्रायव्हर भेटला. अब्दुल कादिर असे त्याचे नाव आहे. ते २६ वर्षांचे आहेत. गेल्या सात वर्षांत त्यांनी एकही प्रवास रद्द केलेला नाही. त्यांच्या गाडीत बरेच काही आहे. प्रथमोपचार किटपासून (first aid kit)खाण्याच्या पदार्थांपर्यंत अनेक आवश्यक गोष्टी या कॅबमधे आहेत आणि या गोष्टींसाठी अब्दुल कोणतेही अतिरिक्त शुल्क घेत नाही आणि हो, कॅबमध्ये गरीब मुलांसाठी दानपेटीदेखील आहे. या ट्विटला (twitter) ४८ हजारांहून अधिक लोकांनी पहिले असून ,या पोस्टला (post)जवळपास एक हजार लाइक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्स या कॅब ड्रायव्हरचे कौतुक करत आहेत.

अब्दुल कादिरच्या या कॅबमध्ये बिस्कीट, मिनरल वॉटर,कोल्ड ड्रिंक, वर्तमानपत्र ,परफुम्स अशा अनेक गोष्टी प्रवाशांसाठी यामध्ये पुरवलेल्या आहेत. तसेच त्यांनी या कॅबमधे, एक नोटीसही लावलेली आहे ज्यात त्यांनी लिहिले आहे की,आम्ही सर्व धर्मांच्या लोकांचा आदर करतो. यात त्यांनी आणखी एक नोटीस (notice)लावली आहे ज्यात त्यांनी लिहिले आहे की, कॅबमधील सर्व सुविधा मोफत आहेत आणि यात WIFI सुविधादेखील आहे.

हे ही वाचा:

समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावर मोदींना आम आदमी पार्टीने दिला पाठिंबा

Ashadhi Ekadashi 2023 : उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात ? बनवा उपवासाची खास फराळी भेळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version