दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री करोडपती; अतिशी यांच्याबद्दल माहित आहे का?

दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री करोडपती; अतिशी यांच्याबद्दल माहित आहे का?

आतिशी मार्लेना आम आदमी पक्षाच्या नेत्या यांच्याकडे दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची धुरा आली आहे. अवघ्या १२ वर्षात त्या राजकारणात आल्यानंतर मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचल्या. तसेच तब्बल ११ वर्षांनंतर दिल्लीलाही महिला मुख्यमंत्री मिळाली आहे. त्यामुळे आतिशी यांची हि नवी इनिंग कशी असेल याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

दिल्लीचं मुख्यमंत्रीपद तब्ब्ल ११ वर्षानंतर महिलेकडे आले आहे. यापूर्वी कॉंग्रेसच्या दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांनी दिल्लीच मुख्यमंत्रीपद समर्थपणे सांभाळल होत. आता आपच्या नेत्या आतिशी मार्लेना यांच्याकडे हे पद आलं आहे. आतिशी या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत जवळच्या आहेत. विश्वासू सहकारी आहे. शिवाय अत्यंत बुद्धिमान आहेत. त्यामुळे त्याच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. आतिशी या परदेशात शिकलेल्या आहेत. आतिशी यांच्याकडे एक कोटीपेक्षा अधिक संपत्ती आहे.

आतिशी या आम आदमी पार्टीच्या आमदार आहेत. ८ जून १९८१ रोजी दिल्लीत त्याचा जन्म झाला. आतिशी यांच्या आईचं नाव तृप्ती वाही आणि वडिलांचं नाव विजय कुमार सिंग आहे. आतिशी यांचे वडील दिल्ली विद्यापीठातील प्राध्यपक होते. कार्ल मार्क्स आणि लेनिन यांच्या नावातून मार्लेना हा शब्द तयार करून आतिशी यांनी आपल्या नावामागे जोडला. त्यानंतर त्याचं नाव आतिशी मार्लेना असं पडलं. आतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात. दिल्लीच्या स्प्रिंगडेल शाळेमधून आतिशी यांचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यानी स्टिफेन्स कॉलेजातून पदवी घेतली. डीयूमधून शिक्षण घेतल्यावर त्यांनी रॉड्स स्कॉलरशीप मिळवून लंडनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून मास्टर्स केलं. मध्यप्रदेशातील एका छोट्या खेड्यात सात वर्ष आतिशी या राहिल्या होत्या. त्या ठिकाणी आतिशी यांनी जैविक शेती आणि प्रगतीशील शिक्षण प्रणालीचा अभ्यास केला. अनेक एनजीओसोबत त्यांनी काम केलं.

ना घर, ना जमीन –
आतिशी यांनी २०१२ मध्ये राजकारणात पाऊल टाकलं. अरविंद केजरीवाल याच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात त्या सामील झाल्या. २०१९च्या निवडणुकीत दिल्ली पूर्वमधून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र गौतम गंभीर भाजपचे उमेदवार यांनी त्याना पराभूत केले. आतिशी याना २०२० मध्ये विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. या मतदारसंघातून त्या विजयी झाल्या. आतिशी मार्लेना यांच्याकडे १ कोटीची संपत्ती असली तरी त्यांच्याकडे जमीन नाही,स्वतःच घर नाही आणि कोणत्याही प्रकारची ज्वेलरी नाहीये.

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version