Tirumala Tirupati Devasthanam दर्शनासाठी तिकिटांची मागणी वाढली, ४० मिनीटात सर्व तिकिटांची झाली विक्री

वैकुंठ द्वार दर्शनाच्या १० दिवसांच्या दर्शनासाठी ३०० रुपयांची २ लाख विशेष प्रवेश दर्शन तिकिटे शनिवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आली.

Tirumala Tirupati Devasthanam दर्शनासाठी तिकिटांची मागणी वाढली, ४० मिनीटात सर्व तिकिटांची झाली विक्री

भाविकांकडून तिरुमला श्रीवारी वैकुंठ (Tirumala Tirupati Devasthanam) दर्शनाच्या तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. भाविकांच्या अभूतपूर्व मागणीमुळे अवघ्या ४० मिनिटांतच ही तिकिटे विकली गेली आहेत. TTD द्वारे वैकुंठ द्वार दर्शनाच्या १० दिवसांच्या दर्शनासाठी ३०० रुपयांची २ लाख विशेष प्रवेश दर्शन तिकिटे शनिवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आली. परंतु ही तिकिटे पटकन विकली गेल्यामुले आणि तिकिटांचा कोटा संपल्यामुळे भाविकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच १ जानेवारीला तिरुपतीमधील भक्तांना वैकुंठ द्वार दर्शनासाठी ऑफलाइन मोडद्वारे TTD टोकन वाटप करणार आहे. TTD ने तिरुपतीमधील ९ केंद्रांद्वारे ५ लाख तिकिटांचे प्रतिदिन ५० हजार दराने वाटप केले आहे. १ जानेवारीला सर्वदर्शन तिकीट दिले जाणार आहे. शिवाय,TTDचे म्हणणे आहे की वैकुंठाच्या दहा दिवसांच्या दर्शनादरम्यान अशाच भाविकांना प्राधान्य दिले जाईल ज्यांच्याकडे तिकीट असेल. शिवाय वाहतूकही वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. TTD ने सर्वसामान्य भाविकांना प्राधान्य देण्यासाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. २ जानेवारीला व्हीआयपी स्वत:च्या घटनात्मक क्षमतेने आले तर त्यांना दर्शन घेता येईल.

तिरुमला श्रीवरी येथे दरवर्षी वैकुंठ एकादशीला भाविकांची गर्दी असते. त्या दिवशी उत्तर दरवाजातून दर्शन घेतल्यास चांगल्या गोष्टी घडतील, अशी भाविकांची श्रद्धा आहे. एकादशी आणि द्वादशी, या दोनच दिवशी वैकुंठद्वार उघडे असते, त्यामुळे फारसे लोक दर्शन घेत नाहीत. यासह, टीडीडीने भाविकांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा, वैकुंठ दरवाजा दहा दिवस उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळीही भाविक १० दिवस स्वामींचे दर्शन घेणार आहेत.

शिवाय TTD ने आणखी एक निर्णय घेतला आहे. तिरुमला श्रीवारी मंदिराने दर्शनाच्या वेळेत बदल केला आहे. १ डिसेंबरपासून एक महिना प्रायोगिकरित्या या निर्णयाची चाचणी केली जाईल. त्यानंतर टीटीडी निर्णय अंमलात आणायचा कि नाही हे ठरवेल. श्रीवाणी ट्रस्टने श्रीवारी दर्शनाची ऑफलाइन तिकिटे माधवम गेस्ट हाऊस, तिरुपती येथे उभारलेल्या काउंटरवर उपलब्ध करून दिली आहेत. तसेच TTD ने तिरुपती विमानतळावर तिकिटांचे एक काउंटर उभारले आहे.

हे ही वाचा:

ऐन Christmas च्या हंगामात अमेरिकेत धडकणारा ‘Bomb Cyclone’ आहे तरी काय?

अवतार २ ( Avatar:The Way of Water) चित्रपटाने केली २०० कोटीची कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version