spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

साईबाबांबद्दलच्या ‘त्या’ विधानावर दिलं धीरेंद्र शास्त्रींनी दिले स्पष्टीकरण

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांनी साईबाबा यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केलं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच कडाडले आहेत

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले आहेत. त्यांनी साईबाबा यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केलं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच कडाडले आहेत.बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबा यांच्याविषयी केलेल्या एका वक्तव्याचे पडसाद राज्यासह देशभरात पडताना दिसत आहेत. आपल्या भक्तांच्या या प्रश्नांवर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, मी साईंना देव मानत नाही. ‘साई संत असू शकतो, फकीर असू शकतो, परंतु देव होऊ शकत नाही’ असं वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानाला आता प्रचंड विरोध होत आहे. त्यावरून वाद सुरू झाल्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता त्याबाबतही माफीनामा जारी केला आहे.

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे त्यांच्या दरबारात केल्या जाणाऱ्या चमत्करांमुळे चर्चेत आले. . त्यानंतर त्यांनी मुलाखतींमधून केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ते चर्चेत आले. त्यांनी संत तुकाराम यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान करून त्यावर माफी मागितली होती. संत तुकारामांबद्दल केलेल्या विधानावर माफी मागत नाही तर त्यांनी स्वतःच पुन्हा साईबाबांवर विधान करून पुन्हा सगळ्यांचं रोष पत्करू घेतला.त्यावरून पुन्हा नवीन वडाळा वाचा फोडली असंम्हणायला काही हरकत नाही. धीरेंद्र शास्त्री यांनी जबलपूरमध्ये भाविकांशी संवाद साधताना साईबाबांविषयी एक विधान केलं होतं. एका भाविकाने साईबाबांची पूजा करावी की नाही? असा प्रश्न धीरेंद्र शास्त्रींना विचारताच “गिधाडाचं चामडं पांघरूण कुणी सिंह होत नाही”, अशी म्हण सांगत त्यांनी उत्तर दिलं होतं. “आम्ही कोणाच्याही भावनेचा अपमान करत नाही. साईबाबा संत असू शकतात. फकीर असू शकतात. मात्र, ते देव होऊ शकत नाही”, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते.

या वक्तव्यामुळेच व निर्माण झाला. आणि या मध्ये देखील राजकारणी लोकांकडून हस्तेक्षेप केला गेला. त्यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांच्या धीरेंद्र शास्त्रींनी बागेश्वर धामच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माफीनामा जाहीर केला आहे. “मी नेहमीच संत आणि महापुरुषांचा सन्मान ठेवला आहे आणि कायम ठेवेन. मी एक म्हण सांगितली होती. त्याचा साधारण अर्थ होता की जर आपण मागे छत्री लावून म्हणालो की आम्ही शंकराचार्य आहोत, तर हे कसं होऊ शकेल. आपल्या शंकराचार्यांनी जे सांगितलं, तेच मी पुन्हा सांगितलं”, असं या ट्विटमध्ये धीरेंद्र शास्त्रींनी म्हटलं आहे.आणि आपले मत स्पष्ट केला आहे. तसेच माझ्या कुठल्या शब्दामुळे कुणाचं मन दुखावलं गेलं असेल, तर आम्हाला त्याचं मनापासून दु:ख आणि खेद आहे”, असंही धीरेंद्र शास्त्रींनी ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

हे ही वाचा : 

देशभरात हनुमान जयंतीचा जल्लोष, वर्षातून दोन वेळा का साजरी केली जाते हनुमान जयंती

दबंग अभिनेता सलमान खान लुंगी लूकमध्ये दिसणार

आदित्य ठाकरे यांनी भाषणातून केला विरोधकांवर हल्लाबोल

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss