धीरेंद्र शास्त्री पुन्हा एकदा बरळले, साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य

धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराजने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या कथित चमत्कार आणि विधानांमुळे त्यांची दिवसेंदिवस ओळख वाढत चालली आहे. बागेश्वर बाबा पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

धीरेंद्र शास्त्री पुन्हा एकदा बरळले, साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य

धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराजने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या कथित चमत्कार आणि विधानांमुळे त्यांची दिवसेंदिवस ओळख वाढत चालली आहे. बागेश्वर बाबा पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांबाबत वक्तव्य केलं आहे. बाबा बागेश्वर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये धीरेंद्र शास्त्री साईबाबांना देव मानत नसल्याचे सांगत आहेत.

बागेश्वर शास्त्री यांच्या एका भक्ताने त्यांना प्रश्न विचारला. डॉ. शैलेंद्र राजपूत नावाच्या व्यक्तीने निवेदक धीरेंद्र शास्त्रीला विचारले की, मला एक प्रश्न आहे की आपल्या देशामध्ये बरेच लोक साईबाबांचे भक्त आहेत. पण सनातन धर्म साईंची उपासना नाकारत असल्याचे दिसते. तर साईंबाबांची पूजा फक्त सनातन पद्धतीने केली जाते. त्यामुळे तुम्ही सर्वानी त्यावर प्रकाश टाका. आपल्या भक्तांच्या या प्रश्नांवर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, मी साईंना देव मानत नाही.

सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्या धर्मातील शंकराचार्यांनी साईबाबांना देवतांचे स्थान दिले नाही. शंकराचार्यांची आज्ञा पाळणे हा प्रत्येक सनातनीचा धर्म आहे आणि ते आपल्या धर्माचे प्रधान आहेत. कोणताही संत असो मग तो आपल्या धर्माचा असो किंवा दुसऱ्या धर्माचा असो तो संत असू शकतो, महापुरुष असू शकतो परंतु देव नाही. साईबाबा हे संत होऊ शकतात, फकीर होऊ शकतात पण देव होऊ शकत नाही, कोल्ह्याची कातडी धारण करून कोणी सिंह होऊ शकत नाही. एक कोल्हा एक कोल्हाच राहील असे वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केले आहे.

हे ही वाचा : 

IPL 2023, ३१ मार्च रोजी होणार आयपीएल उद्घाटन सोहळा

छ. संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version