Russia-Ukraine मध्ये वाद सुरूच, तब्ब्ल ५१ जणांचा मृत्यू, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले…

रशिया आणि युक्रेनमध्ये मागील ५०० दिवसापासून युद्ध सुरु आहे. या युद्धाच्या काळात दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Russia-Ukraine मध्ये वाद सुरूच, तब्ब्ल ५१ जणांचा मृत्यू, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले…

रशिया आणि युक्रेनमध्ये मागील ५०० दिवसापासून युद्ध सुरु आहे. या युद्धाच्या काळात दोन्ही देशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी (५ ऑक्टोबर) रशियन सैन्याने ईशान्य युक्रेनमधील ह्रोझा गावावर क्षेपणास्त्राने हल्ला केला. एका युक्रेनियन सैनिकाच्या मृत्यूनंतर त्याची शोकसभा ठेवण्यात आली होती. या सभेसाठी मोठ्या संख्येने लोक हजर होते तेव्हा रशियाने त्याच्यावर हल्ला केला.

रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले हा हल्ला मुद्दाम करण्यात आला आहे. याला कोणत्याही प्रकारचा आंधळा हल्ला म्हणता येणार नाही. झेलेन्स्की युरोपियन राजकीय समुदायाच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्पेनमध्ये गेले होते. शिखर परिषदेदरम्यान रात्रीच्या व्हिडीओ संबोधनात सांगितले की खार्किव प्रदेशातील एका खेड्यात एका दुकानावर मुद्दाम क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. रशियन सैनिक कुठे हल्ले करतात याची त्यांना कल्पना नाही. ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला त्या ठिकाणीतील दुकानाची बिकट अवस्था झाली आहे. तसेच विटा, तुटलेले धातू व बांधकाम साहित्याचे नुकसान झाले आहे. रशियाच्या आक्रमणानंतर १९ महिन्यांहून अधिक काळ झालेल्या खार्किव प्रदेशातील हा सर्वात प्राणघातक हल्ला होता. रशियाने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत मारल्या गेलेल्या नागरिकांची ही सर्वाधिक संख्या होती. स्थानिक पोलिसांनी नॅशनल टेलिव्हिजनला सांगितले की हल्ल्यातील मृतांची संख्या ५१ आहे, तर ६ लोक जखमी झाले आहेत आणि ३ बेपत्ता आहेत.

युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेंको यांनी सांगितले की, क्षेपणास्त्र हल्ला झाला तेव्हा स्थानिक अधिकारी जेवायला बसले होते. क्लिमेंको यांनी युक्रेनियन प्रसारमाध्यमांना सांगितले की, ही एक भयंकर शोकांतिका आहे. प्राथमिक माहितीचा हवाला देत क्लिमेन्को यांनी सांगितले की, इस्कंदर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. ते म्हणाले की हा हल्ला स्पष्टपणे लक्ष्यित होता आणि युक्रेनियन सुरक्षा सेवांनी तपास सुरू केला आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तम उमरोव यांनी सांगितले की, रशियाकडून जाणूनबुजून जेवणाच्या वेळी हल्ला करण्यात आला, जेणेकरून जास्तीत जास्त जीवितहानी होऊ शकते.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version