spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : तुळशी विवाहाची संपूर्ण विधी, जाणुन घ्या

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून घरोघरी तुळशीच्या विवाहाची (Tulsi Vivah 2022) लगबग सुरु होते. दिवाळी संपल्यावर तुळशी विवाह (Tulsi Vivah) करतात. तसेच तुळशीचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. अंगणात तुळशीचे रोप असावे त्यामुळे घरात सुख सम्रुद्धी नांदते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून तुळशी विवाहाची संपूर्ण विधी सांगणार आहोत.

दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नाला देखील हिंद धर्मात खूप महत्व आहे. या दिवसापासून विवाह, गृहप्रवेश, या सर्व मुहूर्तांना सुरुवात होते. तसेच तुळशी विवाह (Tulsi Vivah) हा अगदी घरच्या विवाह समारंभाप्रमाणे अंगणातील तुळशीचा विवाह केला जातो.

तुळशी विवाह (Tulsi Vivah) शनिवार ५ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ६:०८ वाजता सुरू होईल आणि २६ नोव्हेंबर (November) २०२२ रोजी संध्याकाळी ५:०६ वाजता संपेल.

कार्तिकी एकादशीला सर्व मंगलमय कार्याची सुरुवात होते. तसेच तुळशी विवाह केल्याने घरातील मंगलमय कार्य चांगले होतात. म्हणून तुळशी विवाह केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी अंगण साफ सूत्र करून टाकतात. तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. अंगणात मोठया प्रमाणत रांघोळी काढतात. दिवे लावून अंगणात रोषणाई करतात. आजूबाजूचा लोकांना आमंत्रण करतात.

तुळशी विवाह हा धूमधडाक्यात केला साजरा केला जातो. तुळशीचे लग्न उसा सोबत लावतात. नंतर अंतर पाट पकडुन लग्नाचे मंत्र बोले जातात. त्यानंतर अक्षता टाकून पेडे वाटले जातात. मग तुळशीला प्रत्येक जण जसे नवरीला नटवतात तसे नटवतात. आणि तुळशीला साडी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. मंगळसूत्र, जोडवी, नारळाने आणि खणाने ओठी बहरतात. आणि गौरी पूजन देखील करतात. तुळशीचे विवाह केल्याने लक्ष्मी आणि विष्णू प्रसन्न होतात. विवाह मध्ये पोथी-पुराण वाचले जातात. आणि Star कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. लग्न झाल्यानंतर मोठया प्रमाणत लोकांना जेवणासाठी आमंत्रण केले जाते.

हे ही वाचा :

गुजरातमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आचासंहिता लागू, ‘या’ दिवशी मतदान होण्याची शक्यता 

पाकिस्तानच भविष्य भारताच्या हाती; पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये आता भारतच पोहोचवू शकतो

‘मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी व अभिनय यांच्या प्रेमाला ‘रंग लागला’ चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss