भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का? तेंडुलकर, कोहली आणि विराटला सुद्धा टाकले मागे

वडीलांच्या निधनानंतर मे २०१२ मध्ये समरजित सिंह गायकवाड यांचा महाराजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला.

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू तुम्हाला माहित आहे का? तेंडुलकर, कोहली आणि विराटला सुद्धा टाकले मागे

संपूर्ण जगात सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध खेळ म्हणजे क्रिकेट. भारतात देखील क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे. भारतात तसेच जगभरात सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni), विराट कोहली (Virat Kohli), युवराज सिंह (Yuvraj Singh), रोहित शर्मा (Rohit Sharma) यासारख्या क्रिकेट खेळाडूंचा वेगळा आणि मोठा चाहतावर्ग आहे. या खेळाडूंकडे अफाट संपत्ती आहे. हे खेळाडू क्रिकेटमधूनच नाही, तर व्यवसाय, मॉडेलिंग आणि जाहिराती अशा विविध पद्धतीने कोट्यवधींची कमाई करतात.तसेच सोशल मीडिया पोस्टवरूनही हे खेळाडू कमाई करतात.परंतु यापैकी एकही खेळाडू हा भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडू नाहीये. हे ऐकून तुम्हाला ही धक्का बसला असेल परंतु हे खरं आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर म्हटल्यावर सचिन तेंडुलकर, धोनी किंवा विराट कोहली यांचा विचार तुमच्या डोळ्यासमोर आला असेल. परंतु यापैकी एक नसून भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर गुजरातचा एक फलंदाज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, समरजितसिंह रणजितसिंह गायकवाड (Samarjitsinh Ranjitsinh Gaikwad) हे क्रिकेट खेळणारे सर्वात श्रीमंत भारतीय आहेत. समरजितसिंह गायकवाड हे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आहेत. समरजित सिंह गायकवाड हे गुजरातमधील बडोद्याचे माजी राजे आहेत. त्यांचा जन्म २५ एप्रिल १९६७ रोजी झाला. समरजितसिंह गायकवाड हे रणजितसिंह प्रतापसिंह गायकवाड (Ranjitsinh Pratapsinh Gaikwad) आणि शुभांगिनी राजे (Shubhangini) यांचे एकुलते एक पुत्र आहेत.

वडीलांच्या निधनानंतर मे २०१२ मध्ये समरजित सिंह गायकवाड यांचा महाराजा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. त्यांना वारसाहक्काने २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती मिळाली आहे. जगातील सर्वात मोठं खाजगी निवासस्थान असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसचेही ते मालक आहेत. गुजरात आणि बनारस, उत्तर प्रदेशमध्ये १७ मंदिरे चालवणाऱ्या मंदिर ट्रस्टवरही त्यांच्या मालकीत आहेत. समरजितसिंह गायकवाड यांचा विवाह राधिकाराजे (Radhikaraje) यांच्याशी झाला आहे. त्या वांकानेर राज्यातील राजघराण्यातील आहेत.

हे ही वाचा:

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटील म्हणाले…

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करु असा शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मानस

हिंदू असो की मुस्लिम यांचे रक्त एकच, एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version