Sunday, June 30, 2024

Latest Posts

“अफवांना बाळी पडू नका” IRCTC ने केले लोकल प्रवाश्यांना आवाहन ; जाणूयात सविस्तर वृत्त

"मात्र वैयक्तिक युजर आयडीद्वारे बुक केलेली तिकिटे व्यावसायिकरित्या विकली जाऊ शकत नाहीत आणि तसे करणे गुन्हा आहे " असे आयआरसीटीसीने म्हटले आहे. कोणीही असे करताना आढळल्यास, रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४३ नुसार कठोरात कठोर  कारवाईची तरतूद केली आहे

आजकालचे जग आता फारच प्रगत होत चाललंय. ही प्रगती मानवाच्या दृष्टीने जितकी चांगली तितकीच वाईट सुद्धा आहे. आता संपूर्ण जग हे पेपरलेस (Paperless)  होऊ पाहत आहे. यासाठी अनेक नव्या यंत्रणासुद्धा सुसज्ज होत आहेत. त्याही यंत्रणा मानवानेच निर्मण केल्या आहेत. त्याचप्रमाणे आता आपण लोकल तिकीट काढायचं म्हंटल तर लोक कंटाळा करतात त्या लायनीत उभ राहिला त्यामुळे लोक शक्यतो युटीएस असेल किंवा  IRCTC या चायनल्सचा वापर अधिक करतात.

त्यामुळे भारतीय रेल्वेने (Indian Railway) दररोज लाखो लोक प्रवास करतात. पण आजकाल बहूतांश लोक तिकीट विकत घेण्यासाठी स्टेशनवर जात नाहीत. तर IRCTC वेबसाइट, मोबाइल ॲप किंवा थर्ड पार्टी साइटवरून ऑनलाइन बुक करणे पसंत करतात. लोक त्यांचा स्वतःचा IRCTC आयडी वापरून स्वतःसाठी तसेच प्रसंगी त्यांचे नातेवाईक किंवा मित्रांसाठीही तिकीट बूक करतात. पण तुम्ही तुमच्या खात्यातून दुसऱ्याचे तिकीट बुक केल्यास तुरुंगात जाऊ शकता अशी अफवा पसरवली जात आहे. तर यावर IRCTC चेने उत्तर दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच अशी अफवा पसरली होती की तुम्ही तुमच्या IRCTC खात्यातून इतरा कोणासाठी तिकीट बुक केलं तर तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पण आता ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म IRCTC ने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. IRCTC म्हणाले की-  “सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या बातम्या निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या असल्याचे IRCTC नमूद केले आहे. अशा खोट्या बातम्या पसरवू नका आणि त्यापासून दूर रहा. असे आवाहनही IRCTC ने लोकांना केले आहे. रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (IRCTC) साईटवर बूकिंग केले जाते,” असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

IRCTC चे म्हणणं पुढील प्रमाणे आहे. 

खरं तर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही पोस्ट व्हायरल होत होत्या. एखाद्या व्यक्ती आपल्यापेक्षा वेगळे अथवा दुसरे आडनाव असलेल्या व्यक्तीकडून आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून किंवा ॲपवरून तिकीट बूकिंग करून घेऊ शकत नाही, असे त्यामध्ये म्हटले होते. इतर आडनाव असलेल्या व्यक्तीकडून तिकीट बूकिंग केल्यास शिक्षा होऊ शकते, अशी अफवाही पसरली होती. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर IRCTC ने X (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली असून स्पष्टीकरण दिलं. ते आपण यात सविस्तर पाहू.

कोणतीही व्यक्ती आपला युजर आयडी वापरून आपले मित्र, कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसाठी तिकीट बुक करू शकते, असे त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला एक वापरकर्ता साधारण १२ तिकिटे बुक करू शकतो. जर वापरकर्त्याने आपली ओळख आधार कार्ड द्वारे पटवली असेल तर ती व्यक्ती दर महिन्याला २४ तिकिटे बुक करू शकते. केवळ आयआरसीटीसीच नाही तर भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्यानेही ट्विटरवरील आपल्या पोस्टमध्ये ही बातमी दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले आहे.

“मात्र वैयक्तिक युजर आयडीद्वारे बुक केलेली तिकिटे व्यावसायिकरित्या विकली जाऊ शकत नाहीत आणि तसे करणे गुन्हा आहे “ असे आयआरसीटीसीने म्हटले आहे. कोणीही असे करताना आढळल्यास, रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १४३ नुसार कठोरात कठोर  कारवाईची तरतूद केली आहे, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

IRCTC च्या स्पष्टीकरणावरून एखादी व्यक्ती आपल्या आयडीने १२ जनाची तिकीट काढू शकते तसेच आधारकार्डचा यात आयडी म्हणून वापार केला असता ती व्यक्ती एकूण २४ तिकीट कढु शकते. परंतु या अधिकाराचा गैरवापर करून जर कोणी व्यावसायिकरित्या त्याचा वापर करत असेल तर तो गुन्हा म्हणून संबोधलं जाऊ शकतो व संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येऊ शकते. हे स्पष्ट होते.

हे ही वाचा

PUNE HIT-AND-RUN: अपघाताप्रकरणी एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना केले मोठे आवाहन..

महिलांसाठी खुशखबर ! राज्यात येणार ‘ही’ नवी योजना..  

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss