भाज्या खायला आवडत नाही? मग भाज्यांपासून बनवा Tasty Veggie Pancake

अनेकदा लहान मुले भाज्या खाण्यासाठी टाळाटाळ करतात. पण भाज्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात. अशा वेळी तुम्हाला त्यांना भाज्या खाऊ घालायच्या असतील तर तुम्ही याच भाज्यांपासून रुचकर असा वेजी पॅनकेक हा पदार्थ बनवू शकता.

भाज्या खायला आवडत नाही? मग भाज्यांपासून बनवा Tasty Veggie Pancake

अनेकदा लहान मुले भाज्या खाण्यासाठी टाळाटाळ करतात. पण भाज्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात. अशा वेळी तुम्हाला त्यांना भाज्या खाऊ घालायच्या असतील तर तुम्ही याच भाज्यांपासून रुचकर असा वेजी पॅनकेक हा पदार्थ बनवू शकता. हा पदार्थ खायला फार रुचकर आणि चमचमीत लागतो. तसेच अगदी कमी वेळेत हा पदार्थ तयार होतो. नाश्त्यासाठी तर पदार्थ अगदी उत्तम. शिवाय तुम्ही हा पदार्थ टिफिनसाठीही बनवू शकता. चला तर पाहुयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

– १ कप बेसन (cup gram flour)
– अर्धा कप रवा (semolina)
– २ गाजर किसलेले (carrots grated)
– १ कांदा बारीक चिरलेले (onion finely chopped)
– कोबी बारीक चिरलेली (Finely chopped cabbage)
– कोथिंबीर बारीक चिरलेली (Finely chopped coriander)
– काही पुदिन्याची पाने (mint leaves)
– २-३ बारीक चिरलेली हिरवी मिरची (finely chopped green chillies)
– १ चमचा लाल तिखट (red chillies)
– काळी मिरी बारीक केलेली (Ground black pepper)
– अर्धा चमचा ओवा (oats)
– चिमूटभर हिंग (asafoetida)
– चवीनुसार मीठ (Salt)

कृती :

टेस्टी वेजी पॅनकेक बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या सर्व भाज्या बारीक चिरून यात टाकू शकता. पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम बेसन आणि रवा यांचे घट्ट बॅटर तयार करा. त्यात चवीनुसार मीठ घाला. सोबतच यात ठेचलेली काळी मिरी, ओवा, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका. मग यात गाजर, बटाटे, कोबी आणि कांदे चांगले किसून टाका. त्यात कोथिंबीर आणि काही पुदिन्याची पाने बारीक चिरून टाका. आता या सर्व गोष्टी हाताने नीट मिक्स करा. लक्षात ठेवा की हे मिश्रण थोडे घट्ट ठेवावे. यामुळे भाज्यांच्या पाण्याव्यतिरिक्त फार कमी पाणी घालून पीठ तयार करा. यानंतर तवा गरम करून त्यावर बॅटर टाका आणि चमच्याने दाबून गोल व सपाट आकार द्या. आता काही वेळ शिजवून दोन्ही बाजूंनी तेल घालून सोनेरी होईपर्यंत हे पॅनकेक शिजवा आणि मग केचप किंवा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी गरमागरम सर्व्ह करा.

हे ही वाचा:

EYE FLUE : आय फ्लूवर मात कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर

AI ची कमाल, Barbie Look मध्ये राजकारणी

Welcome 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version