spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पट्ठ्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात मारली डुबकी

महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन-चार दिवसांपासून चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे कामावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अनेक अडचणींनाचा सामना करावा लागत आहे.

महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन-चार दिवसांपासून चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे कामावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अनेक अडचणींनाचा सामना करावा लागत आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, दादर, घाटकोपर, नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस झाला. सायनमध्ये अनेक भागांत पाणी साठल्याचं पाहायला मिळालं.हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेता पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यावर मोठे संकट येण्याची शक्यता आहे.

रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असताना दिसून येतोय. ह्या व्हिडीओत चक्क एक माणूस रस्त्यावर साचलेल्या पाण्यात स्विमिंग पूल मध्ये असल्यासारखं पोहताना दिसतोय. अनेक गाड्या देखील त्या पाण्यामधून जात आहेत मात्र त्या माणसाला त्या पाण्यात बरीच मज्जा येतेय. हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेक नेटकरी हा व्हिडीओ पाहून खळखळून हसत आहेत.

काही दिवस पावसाने जोर धरला आहे. ठाणे, मुंबई मुसळधार धुळे, नंदुरबार, जळगाव : मध्यम ते जोरदार पाऊस नाशिक काही ठिकाणी : मुसळधारनगर, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद : मध्यमऔरंगाबाद, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड : मध्यम ते जोरदारविदर्भातील सर्वच जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे

Latest Posts

Don't Miss