spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव भिडणार गगनाला…ग्राहकांमध्ये नाराजी

वाढत्या सोने चांदीच्या भावामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. दरम्यान गेल्या ऑगस्ट महिन्यात सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल २००० रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या सणासुदीचे दिवस आले असतानाच गेल्या काही महिन्यांपासून सोने चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याचा खरेदीदारांना मोठा फटका बसत आहे. या भाव वाढीमुळे सोने चांदी खरेदी करावी का नको? असा प्रश्न ग्राहकांना सतत पडत आहे. वाढत्या सोने चांदीच्या भावामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. दरम्यान गेल्या ऑगस्ट महिन्यात सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. महिनाभरात सोन्याच्या दरात तब्बल २००० रुपयांची वाढ झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजरवर सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून येत आहे. ऑगस्टमध्ये सोन्याच्या दरात ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दारात १ टक्क्याहून घसरण झालेली दिसून येत आहे. जिथे ऑगस्ट महिन्यात चांदीच्या दरात ५०० रुपयांची घसरण दिसून आली आहे. सप्टेंबर महिन्यात सोन्या चांदीची स्थिती काय असणार आहे? असा प्रश्न मात्र सर्व ग्राहकांना पडला आहे. परदेशातील बाजारात देखील सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. अमेरिकेची महागाई आणि अर्थव्यवस्थेची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीचा निर्णय घेते की नाही हे समजेल. त्याचप्रमाणे फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांनी आधीच पुष्टी केली आहे की, सप्टेंबरमध्ये होणारी बैठक कमी केली जाऊ शकते. जर 0.२५ किंवा त्याहून अधिकची घट दिसली तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसू शकते.

आकडेवारीनुसार, ३१ जुलै रोजी सोन्याचा भाव ७० हजार रुपयांच्या खाली होता आणि ६९,६५५ रुपये प्रति दहा ग्रॅम होता. जी ऑगस्टच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ३० ऑगस्ट रोजी वाढून ७१,६११ रुपये प्रति ग्रॅम इतका झाला. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किंमतीत २ टक्के म्हणजेच १,९५६ रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, येत्या सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

हे ही वाचा:

 

Latest Posts

Don't Miss