दिल्ली-एनसीआरमध्ये आणि जोशीमठमध्ये भूकंप, ३० सेकंद बसत होते भूकंपाचे धक्के

त्याचबरोबर दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.

दिल्ली-एनसीआरमध्ये आणि जोशीमठमध्ये भूकंप, ३० सेकंद बसत होते भूकंपाचे धक्के

दिल्ली-एनसीआर तसेच उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये आज (२४ जानेवारी) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. उत्तराखंडच्या जोशीमठ आणि रामनगरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आणि उत्तर प्रदेशातील लखनऊमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ५.८ इतकी होती. भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये होते, ज्याची खोली जमिनीच्या खाली १० किलोमीटर होती. त्याचबरोबर दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. आज देशात बिहारपासून हिमाचलपर्यंत सर्वच ठिकाणी सौम्य ते तीव्र असे भूकंपाचे धक्के बसले आहेत.

सुमारे ३० सेकंदांपर्यंत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. अचानक झालेल्या भूकंपामुळे लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले. याआधीही १३ जानेवारी रोजी मध्यरात्री ०२.१२ वाजता उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. दोन दिवसांपूर्वी २२ जानेवारी रोजी उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.८ इतकी मोजली गेली होती. याआधीही १३ जानेवारी रोजी मध्यरात्री २.१२ वाजता उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. ५ जानेवारीला दिल्ली-एनसीआरमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. दिल्लीसोबतच जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले जे भूकंपाची ५.९ या तीव्रतेचे होते. अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश हा ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

भूकंप का होतात आणि कसे होतात?

पृथ्वीच्या खाली असलेल्या प्लेट्स अतिशय संथ गतीने फिरत राहतात. दरवर्षी या प्लेट्स त्यांच्या जागेपासून ४-५ मिमी हलतात. या दरम्यान काही प्लेट कुणाच्या जागेवरून निसटते तर काही त्यांच्या जागेवरून खाली घसरतात. या दरम्यान, ह्या प्लेट्समध्ये होणाऱ्या आदळआपटीमुळे भूकंप होतो. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने संपूर्ण देशाची पाच भूकंप झोनमध्ये विभागणी केली आहे. देशातील एकूण क्षेत्रापैकी ५९ टक्के क्षेत्र भूकंप जोखीम क्षेत्रात येते. भारतातील पाचवा झोन सर्वात धोकादायक आणि सक्रिय मानला जातो. हा सर्वात धोकादायक झोन जम्मू आणि काश्मीर (काश्मीर खोरे), हिमाचल प्रदेशचा पश्चिम भाग, उत्तराखंडचा पूर्व भाग, गुजरातमधील कच्छचा रण आणि उत्तरेकडील भाग, बिहार, भारतातील सर्व ईशान्येकडील राज्ये, अंदमान निकोबार बेटे येथे मोडतो.

हे ही वाचा:

IND vs NZ 3rd ODI रोहित आणि गिलचे अर्धशतक पूर्ण, भारताची १५० धावांच्या दिशेने वाटचाल सुरू

Athiya Shetty – KL Rahul यांचा लग्न सोहळा थाटात झाला संपन्न, पहा खास फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version