spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Earthquake नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली-हरियाणामध्ये भूकंपाचे धक्के

सर्व ठिकाणी नवं वर्षाचे स्वागत हे मोठ्या उत्सहात साजरं केलं जाते. एकीकडे मुंबईसह अनेक ठिकाणी नाव वर्षाचं दमदार स्वागत हे करण्यात आलं आहे.

Earthquake in Delhi : सर्व ठिकाणी नवं वर्षाचे स्वागत हे मोठ्या उत्सहात साजरं केलं जाते. एकीकडे मुंबईसह अनेक ठिकाणी नाव वर्षाचं दमदार स्वागत हे करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली (Delhi) आणि आसपासच्या परिसरात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (National center for seismology) या भूकंपाची तीव्रता मोजली असून याची तीव्रता ३.८ इतकी असल्याचे सांगितले. मात्र या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. विशेष म्हणजे भूकंप झाला, तेव्हा लोक नववर्षाच्या जल्लोषात मग्न झाले होते.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. त्याची खोली जमिनीपासून ५ किलोमीटर खाली होती. दरम्यान, पहाटे १.१९ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. सद्यस्थितीत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही. गेल्या काही महिन्यांत दिल्लीत अनेकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत. दरम्यान, याआधी नोव्हेंबर महिन्यात उत्तराखंडमधील नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल होती. यावेळीदेखील दिल्लीमध्ये हादरे बसले होते.

भूकंप आल्यास काय काळजी घ्याल?

  • भूकंपाचे धक्के जाणवत असतील तर लगेच जमिनीवर बसा आणि डोके खाली टेकवा. मजबूत टेबल किंवा फर्निचरच्या आवरणाखाली स्वतःचा बचाव करणे चांगले होईल.
  • घरातील वडीलधाऱ्यांची आणि मुलांची विशेष काळजी घ्या, त्यांना प्रोत्साहन द्या आणि बचावाच्या पद्धती सांगून त्यांचे संरक्षण करा.
  • भूकंपाचे धक्के खूप तीव्र असतील तर घरातून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर जा.
  • घरातून बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असेल आणि दोन्ही बाजूला घरे बांधलेली असतील तर घराबाहेर पडण्याऐवजी घरातच राहा.
  • भूकंपाच्या वेळी काच, खिडकी, पंखा किंवा झुंबर इत्यादी जड आणि पडणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा.
  • जर तुम्ही अंथरुणावर झोपलेले असाल तर उशीने डोके झाका. मुलांचे निरीक्षण करा.
  • घरातून बाहेर पडताना आणि मोकळ्या मैदानावर किंवा रस्त्यावर उभे राहताना, जवळपास वीज, टेलिफोनचे खांब किंवा मोठी झाडे नाहीत याची खात्री करा.
  • जर भूकंप झाला आणि त्या वेळी तुम्ही वाहन चालवत असाल तर वाहन सुरक्षित ठिकाणी थांबवा आणि काही वेळ वाहनात बसा.
  • अशा परिस्थितीत संयम बाळगा आणि अफवांकडे लक्ष देऊ नका

हे ही वाचा:

चक्क कडाक्याच्या थंडीत बर्फात पोहोणारी हि सुंदरी कोण?, हा Viral Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

corona virus सतर्क रहा , नवीन वर्षातही कोरोनाच सावट कायम.

मुख्यमंत्री शिंदेनी मध्यरात्रीच रक्तदान करत केली नव्या वर्षाची सुरुवात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss