spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Edit Tweet Button : आता ट्विट करा एडिट; एडिट फिचर झाले लाँच

ट्विटर कंपनीचे नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी कंपनीची सूत्रे हाती घेताच ट्विटरमध्ये हा मोठा बदल झाला आहे.

ट्विटर कंपनीचे नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी कंपनीची सूत्रे हाती घेताच ट्विटरमध्ये हा मोठा बदल झाला आहे. ट्विटरने ( Twitter ) भारतात ‘एडिट ट्विट’ बटण ( Edit Tweet Button ) लाँच केले आहे.

ट्विटरने गेल्या महिन्यात सांगितले होते की, एडिट फिचर लाँच करण्यात येणार असून सध्या हे फिचर फक्त निवडक युजर्ससाठी उपलब्ध असेल. या फिचरमध्ये तुम्हाला तुमचं ट्विट दुरुस्त करण्यासाठी ३० मिनिटांचा वेळ मिळेल. यूजर्सकडून एडिट फीचरची सर्वाधिक मागणी करण्यात आली होती. यामुळे युजर्सना टायपिंग चूक दुरुस्त करण्याची किंवा ट्विटमधील हॅशटॅग बदलण्याची संधी मिळेल.

ट्विटर एडिट बटणाचा ( Tweer Edit Feature ) पर्याय सध्या उपलब्ध करून देण्यात आला आहे. या ट्विटरच्या नव्या फिचरमुळे तुम्हाला तुम्ही ट्विट केलेलं ट्विट एडिट म्हणजे दुरुस्त करता येणार आहे. नवीन फीचरमध्ये तुम्हाला ट्विटच्या शेजारी असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला एडिट ट्विट असा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ट्विट एडिट करता येईल. भारतीय व्हेरिफाईड युजर्सना ( Verified Users ) ट्विटरचं एडिट फिचर वापरता येणार आहे.

ट्विट एडिटचं नवीन फिचर सध्या फक्त आयफोन युजर्ससाठी (Ios Users) लाँच करण्यात आलं आहे. भारतातही व्हेरिफाईड युजर्सना ( Verified Users ) ट्विटरचं एडिट फिचर वापरता येणार आहे. एडिट केलेल्या ट्विटवर युजर्सना ट्विट एडिट केलेली वेळही दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही ट्विट एडिट केलेला इतिहास तपासू शकता. सध्या हे फीचर निवडक युजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे. लवकरच एडिट फिटर सर्व युजर्ससाठी लाँच करण्यात येईल.

 पेटीएमचे ( Paytm Owner ) संस्थापक विजय शेखर शर्मा ( Vijay Shekhar Sharma ) यांना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट बटणचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यांनी ‘ट्विट एडिट फिचर’चा पर्याय दाखवणारा एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. शर्मा यांनी शुक्रवारी रात्री १०.५२ वाजता ट्विट केलं होतं की, ‘हे ट्विट पोस्ट केल्यानंतर एडिट केलं जाईल.’ त्यानंतर रात्री १०.५३ वाजता तेच ट्विट त्यांनी एडिट केलं आणि लिहिलं, ‘आता हे एडिट केलेलं ट्विट आहे.’ शर्मा यांनी एडिट केलेल्या ट्विटचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, ट्विट एडिट बटणाचा हा पर्याय सध्या व्हेरिफाईट युजर्सना हे नवीन फिचर वापरता येणार आहे.

हे ही वाचा :

साजिद खानच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून अभिनेत्रीवर लैंगिक छळाची तक्रार दाखल

साजिद खानच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून अभिनेत्रीवर लैंगिक छळाची तक्रार दाखल

कुठे नेऊ ठेवला महाराष्ट्र ? टाटा एअरबसनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss