EDUCATION: आता BIOLOGY विषय न घेता DOCTOR होता येणार

नवीन नियमामुळे मेडिकल डिग्री घेण्यास इच्छूक असणाऱ्या ए ग्रुपच्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. या संदर्भात १४ जून २०२३ भारतीय मेडिकल कमिशन (MCI) ची बैठक झाली होती, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

EDUCATION: आता BIOLOGY विषय न घेता DOCTOR होता येणार

बारावीमध्ये विद्यार्थ्यांनी फिजिक्स (PHYSICS) केमिस्ट्री (CHEMISTRY) आणि मॅथेमॅटिक्स (MATHEMATICS) घेतले असेल तरीही त्यांना डॉक्टर (DOCTOR) होता येणार आहे. मेडिकल (MEDICAL) प्रवेशासाठी आता बारावीमध्ये बायोलॉजी (BIOLOGY) विषयाची सक्ती असणार नाही, या संदर्भातील अटींमध्ये बदल करण्यात आला आहे. नॅशनल मेडिकल कमिशन (NATIONAL MEDICAL COMMISSION) कडून यासंदर्भात नवीन गाईडलाईन्स सुरू करण्यात आले आहेत. येत्या २०२४ पासून हा निर्णय लागू होणार आहे. बायोलॉजी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीमध्ये अतिरिक्त विषय म्हणून बायोलॉजी किंवा बायो-टेक्नॉलॉजी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे.

भारतीय मेडिकल कमिशन कडून पदवी चिकित्सा शिक्षा संदर्भातील १९९७ च्या नियमांमध्ये बदल केला आहे त्या नियमानुसार बारावी मध्ये बायोलॉजी असणारे विद्यार्थी मेडिकल प्रवेश परीक्षा देऊ शकत होते. भारतीय मेडिकल कमिशन (MCI) च्या नवीन नियमानुसार, बायोलॉजी (BIOLOGY) नसणारे विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी विदेशात जाऊ शकतात. याआधी अकरावी आणि बारावीत बायोलॉजी विषय असणे महत्त्वाचे होते.

पूर्वी ग्रेजुएट मेडिकल एज्युकेशन (GRADUATE MEDICAL EDUCATION), १९९७ च्या नियमानुसार एमबीबीएस (MBBS) आणि बीडीएस (BDS) प्रवेशासाठी अकरावी आणि बारावीत २ वर्ष बायोलॉजी विषय घेणे आवश्यक होते. हा अभ्यासक्रम नियमित कॉलेजमधून पूर्ण करावा लागणार होता. दिल्ली उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये हा नियम रद्द केला. नवीन नियमामुळे मेडिकल डिग्री घेण्यास इच्छूक असणाऱ्या ए ग्रुपच्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. या संदर्भात १४ जून २०२३ भारतीय मेडिकल कमिशन (MCI) ची बैठक झाली होती, त्यात हा निर्णय घेण्यात आला.

हे ही वाचा:

MMRDA बैठकीत खासदार DR. SHRIKANT SHINDE यांच्या मागणीला यश

MAHARASHTRA: IRCTC वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांना मनस्ताप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version