इलॉन मस्क यांनी घेतला ट्विटरचा ताबा, सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

इलॉन मस्क यांनी घेतला ट्विटरचा ताबा, सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter Deal) खरेदी केल्यानंतर पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांची हकालपट्टी केली आहे. ट्विटरचा बहुचर्चित ठरलेला करार अखेर पूर्ण झाला आहे. यानंतर आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्लाचे मालक एलॉन मस्क हे ट्विटर कंपनी नवे मालक बनले आहेत. ट्विटरची मालकी मिळताच एलॉन मस्क यांनी मोठे बदल केले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एलॉन मस्क यांनी ट्विटरचे सीईओ (CEO – Chief Executive Officer) पराग अग्रवाल यांची हकालपट्टी केली आहे. इतकंच नाही तर सीएफओ (CFO – Chief Financial Office) नेड सेगल (Ned Segal) यांनाही कामावरून कमी करत, या दोघांना कंपनीच्या मुख्य कार्यालयातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांनी गुरुवारी ट्विटर विकत घेतले. त्यानंतर काही तासांतच CEO पराग अग्रवाल यांना हटवण्यात आले. त्यांच्यासोबत मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) नेड सेहगल आणि कायदेशीर व्यवहार आणि धोरण प्रमुख विजया गड्डे या आणखी दोन अधिकाऱ्यांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांच्या संख्येबद्दल त्यांची आणि ट्विटरच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.

त्याचबरोबर मस्क यांनी ट्विटरसोबतच्या कराराची अनेक कारणे दिली आहेत. भविष्यात ट्विटरच्या जाहिरात धोरणातही बदल करण्यात येणार असल्याचे मस्क यांनी सूचित केले. मस्क म्हणाले की, ट्विटर हे सर्वोत्कृष्ट जाहिरात प्लॅटफॉर्म व्हावे अशी माझी इच्छा आहे. जिथे सर्व वयोगटातील युजर्स चित्रपट पाहू शकतील किंवा व्हिडिओ गेम खेळू शकतील. मस्क यांच्यानुसार, त्यांनी ट्विटरवर अधिक पैसे कमवण्यासाठी नव्हे तर मानवतेला मदत करण्यासाठी करार केला आहे. विशेष म्हणजे, न्यायालयाने मस्क यांना सध्याच्या अटींवर २८ ऑक्टोबरपर्यंत ट्विटर करार अंतिम करण्यास सांगितले आहे.

मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही या प्लॅटफॉसोबत यामुळे देखील करार केला आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला एक कॉमन डिजिटल स्पेस मिळू शकेल. इथे अनेक विचारसरणीचे लोक कोणत्याही प्रकारची हिंसा न करता स्वस्थ चर्चा करू शकतात. पुढे जाऊन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाव्या आणि उजव्या पक्षांच्या समर्थकांमध्ये विभागले जातील अशी भीती मस्क यांना वाटते. यामुळे द्वेष पसरेल.

हे ही वाचा :

बच्चू कडू आता थेट शिंदे-फडणवीस यांना नोटीस बजावणार; खोक्यांचा वाद आता कोर्टात पोहोचणार

मुंबईतील टॅक्सी चालक संघटना सीटबेल्ट नियमांच्या विरोधात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version