इलॉन मस्क यांचा मोठा निर्णय; सर्व संचालक मंडळ बरखास्त

इलॉन मस्क यांचा मोठा निर्णय; सर्व संचालक मंडळ बरखास्त

सध्या ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क हे आपल्या कारवाई मुले जगभरात मोठ्या चर्चेत आहेत. तर आज एलोन मस्क यांनी कंपनी ताब्यात घेतल्यानंतर, आता ट्विटरचं संचालक मंडळ बरखास्त केलंय. ट्विटरच्या सर्व संचालकांना हटवून त्यांनी कंपनीची कमान हाती घेतलीय. यासह मस्क यांनी जाहीर केलंय की, ते लवकरच ट्विटरच्या सीईओपदाची जबाबदारी स्वीकारतील. यामुळं इलॉन मस्क आगामी काळात अनेक मोठे निर्णय घेऊ शकतात. ट्विटर डील पूर्ण झाल्यानंतर, इलॉन मस्क ट्विटरचे नवे बॉस बनलेत. त्यांनी सीईओ पराग अग्रवाल (Parag Agarwal) यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना कामावरून काढून टाकलंय. आता मस्क यांनी ट्विटरचं संचालक मंडळही बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय. संचालक मंडळातून ब्रेट टेलर, ओमिड कोर्डेस्तानी, डेव्हिड रोसेनब्लाट, मार्था लेन फॉक्स, पॅट्रिक पिशेट, एगॉन डर्बन, फी-फेई ली आणि मिमी अलेमायेहौ यांची हकालपट्टी करण्यात आलीय.

मागील आठवडय़ात ट्विटरवर मालकी मिळविलेल्या अब्जाधीश इलॉन मस्क यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मस्क यांनी ट्विटरचे संचालक मंडळच बरखास्त केले असून, आता संपूर्ण संचालक मंडळाची जबाबदारी ते एकटेच सांभाळणार आहेत. या अगोदर मस्क यांनी कंपनीची मालकी मिळताच मागील आठवड्यातच कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल आदी अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता मस्क यांनी ट्विटरचे संचालक मंडळही बरखास्त केल्याचे समोर आले आहे.

मस्क यांच्याकडून पहिल्या टप्प्यातील अपेक्षित मनुष्यबळ कपातीचा भाग म्हणून एक चतुर्थाश कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची योजना आखली जात आहे. नियामकांकडे सादर केलेल्या विवरणानुसार २०२१ अखेरीस ट्विटरची एकूण कर्मचारी संख्या ७,००० पेक्षा जास्त होती. यापैकी एक चतुर्थाश कर्मचाऱ्यांची कपात म्हणजे जवळपास २,००० कर्मचाऱ्यांना नारळ दिला जाईल अशी शक्यता आहे. द व्हर्जमधील वृत्तानुसार, मस्क लवकरच ट्विटरवरील पडताळणी प्रक्रियेत बदल करणार आहे. या अंतर्गत मस्क नवीन ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन प्लान आणू शकतात. वापरकर्त्यांकडून १६०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारण्याची योजना आखली जात आहे. त्यामुळं ट्विटर वापरकर्त्यांना मोठा फटका बसणार आहे.

हे ही वाचा :

पुण्यात हॉटेलला भीषण आग; सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका

सामान्य जनतेला दिलासा; LPG Gas सिलेंडर आजपासून ११५ रुपयांनी स्वस्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version