एलोन मस्कचे मँचेस्टर युनायटेड विकत घेत असल्याचे ट्विट झाले व्हायरल

त्याचे ट्विट “ट्विटरवरील दीर्घकाळ चालणाऱ्या विनोदाचा एक भाग आहे.”

एलोन मस्कचे मँचेस्टर युनायटेड विकत घेत असल्याचे ट्विट झाले व्हायरल

एलोन मस्क

“मी मँचेस्टर युनायटेड खरेदी करत आहे, युअर वेलकम ” मस्क, मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील त्याच्या बेजबाबदार ट्विटसाठी ओळखले जातो,, तो नेहमीच लोकांना विचारात पाडणारे किंवा चर्चा करायला लावणारे ट्विटस करत असतो. त्याने ट्विटरवर हल्लीच केलेले ट्विटसुद्धा असेचबात व्हायरल होत आहे.

क्लबचे नियंत्रण करणाऱ्या अमेरिकन ग्लेझर कुटुंबाला मैदानावर संघाच्या संघर्षामुळे मँचेस्टर युनायटेडच्या चाहत्यांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे – ओल्ड ट्रॅफर्ड-आधारित क्लब सध्या प्रीमियर लीगमध्ये 4-0 च्या पराभवानंतर तळाशी गेला आहे. अलिकडच्या वर्षांत, मँचेस्टर युनायटेडच्या चाहत्यांनी ग्लेझर्सचा निषेध केला आहे, ज्यांनी 2005 मध्ये 790 दशलक्ष पौंड ($955.51 दशलक्ष) मध्ये क्लब विकत घेतला होता. मंगळवारपर्यंत, मँचेस्टर युनायटेडचे ​​बाजार भांडवल $2.08 अब्ज होते.

मस्कच्या ट्विटला काही मिनिटांतच हजारो लाईक्स मिळाले आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून आनंददायक प्रतिसादसुद्धा मिळाला. मस्कने नंतर स्पष्ट केले की तो कोणताही क्रीडा संघ विकत घेत नाही आणि त्याचे ट्विट “ट्विटरवरील दीर्घकाळ चालणाऱ्या विनोदाचा एक भाग आहे.”

एलोन मस्कच्या त्या ट्विटनंतर अनेकांनी त्याच्या ट्विटरसोबतच्या करारावर लक्ष वेधले. या वर्षाच्या सुरुवातीला, मस्कने सोशल मीडिया फर्म विकत घेण्याची ऑफर दिली परंतु सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने “स्पॅम बॉट्स” आणि बनावट खाती ट्विटरने उघड केल्याचा दावा करत करारातून त्याने या करारातून माघार घेतली.

हे ही वाचा:

‘आमच्या मध्ये भेदभाव निर्माण करण्याचा सुनील प्रभू याचा प्रयत्न सुरु आहे’

Exit mobile version