spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Engineer’s Day 2024: दरवर्षी १५ सप्टेंबरलाच का साजरा केला जातो ‘इंजिनियर्स डे’?

Engineer’s Day 2024: संपूर्ण भारत देशात १५ सप्टेंबरला ‘अभियांत्रिकी दिन’ (Engineers Day) साजरा केला जातो. भारतातील पहिले अभियंते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. १८६१ साली कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मदनहळ्ळी या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या वडिलांचे निधन झाले. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षणाला पैसे नव्हते. अशा परिस्थितीत विश्वेश्वरय्या यांनी स्वतःच्या विद्वत्तेवर शिष्यवृत्ती मिळवून बंगळुरू येथे सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. अतिशय अवघड असलेली इंजिनिअरिंगची परीक्षा त्यांनी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केली आणि १९०४ साली देशातील पहिले अभियंता बनण्याचा मान मिळवला. वयाच्या अवघ्या तेवीसाव्या वर्षी त्यांच्या बुद्धिमत्तेतील स्थापत्य विषयातील नैपुण्यता लक्षात घेऊन त्यांना तत्कालिन मुंबई इलाख्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

त्या काळात अभियंता या पदावर इंग्रजच अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यामुळे विश्वेश्वरय्या हे पहिले अभियंता बनल्यामुळे संपूर्ण भारतभर त्यांचे कौतुक झाले. विश्वेश्वरय्या यांनी आपल्या कारकीर्दीत २४ वर्षे विविध ठिकाणी नोकरी केली. त्यानंतर म्हैसूर संस्थानचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच कृष्णराज सागर या कावेरी नदीवरील धरणाचे काम त्यांनी पूर्ण केले. म्हैसूरचे हे काम केल्याने त्यांना म्हैसूर संस्थानचे दिवाणपद हे पारितोषिक रुपी बहाल करण्यात आले.

म्हैसुरला त्यांनी म्हैसूर साबण कारखाना, बंगळुरू कृषी विद्यापीठ, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, म्हैसूर आयर्न अँड स्टील वर्क्स, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इतर अनेक उद्योगांची स्थापना केली. महाराष्ट्रातील खडकवासला धरणातील स्वयंचलित दरवाजे ही त्यांचीच देणगी आहे. अशाप्रकारे सेवानिवृत्तीनंतर त्यांनी विविध ठिकाणी अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी केली.

विश्वेश्वरय्या यांचे एकशे एक वर्षांचे वैभवशाली जीवन आणि त्यांचे कर्तुत्व संपूर्ण देश कायम लक्षात ठेवेल. वयाच्या १०१ व्या वर्षी १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर १९६८ मध्ये डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जन्मतारीख भारत सरकारने ‘अभियंता दिन’ म्हणून घोषित केली.

हे ही वाचा:

विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महावाचन उत्सवाचे आयोजन, उत्सवाचे ब्रँड ॲम्बेसिडर Amitabh Bachchan

मरिन लाईन ते वांद्रे सी लिंक हा प्रवास 10 मिनिटात पूर्ण होणार, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प ठरणार गेमचेंजर

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss