चंद्राचे सुंदर दृश्य Chandrayaan-3 च्या कॅमेऱ्यात झाले कैद, विक्रम लँडरने पाठवला चंद्राचा व्हिडीओ

आज चांद्रयान-३ चंद्रापासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर पोहोचले आहे. त्यानंतर विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल.

चंद्राचे सुंदर दृश्य Chandrayaan-3 च्या कॅमेऱ्यात झाले कैद, विक्रम लँडरने पाठवला चंद्राचा व्हिडीओ

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) चांद्रयान-३ (Chandrayaan 3) आता चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. आज चांद्रयान-३ चंद्रापासून केवळ ३० किलोमीटर अंतरावर पोहोचले आहे. त्यानंतर विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल. तसेच या चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटो इस्रोला पाठवले आहेत. या फोटोंमध्ये चंद्राचा पृष्ठभाग स्पष्टपणे दिसत असून या चांद्रयान-३च्या मोहिमेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

चांद्रयान-३ मोहिमेचे लँडर हे १७ ऑगस्ट रोजी प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले होते. यानंतर चंद्राचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो विक्रम लँडर इमेजरमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेरा-१ ने १७ ऑगस्ट रोजी कैद केला आहे. आता १८ ऑगस्ट रोजी, तो चंद्राच्या सर्वात जवळच्या कक्षेत प्रवेश करेल आणि २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर मऊ लँडिंग करणार आहे.

१४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान-३ एलव्हीएम-3 (LVM-3) रॉकेटद्वारे अवकाशात झेपावेल होते. ३.८४ लाख किमीचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान-३च्या मोहिमेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. चांद्रयान-2 च्या लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागापासून 2 किमी आधी संपर्क तुटला होता. चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचं लक्ष लागलं आहे.

तसेच चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग होणार आहे, तो क्षण इस्रोसह प्रत्येक देशवासीयासाठी खूप खास असणार आणि आनंदाचा असणार आहे. प्रत्येकाला हा क्षण थेट पाहायला आवडेल. इस्रो केवळ चांद्रयानच्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण करणार नाही, त्यासोबतच इतर प्लॅटफॉर्मवरही लाइव्ह स्ट्रीमिंग केले जाईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान उतरताना सर्वांना पाहता येणार आहे. स्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, चांद्रयान-३ चे लँडर विक्रम अशा प्रकारे बनवले गेले आहे की त्याचे सर्व सेन्सर आणि दोन्ही इंजिने काम करत नसले तरी ते 23 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यास सक्षम असेल.

हे ही वाचा:

Chandrayaan 3 चे थेट लँडिंग लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहायचे? जाणून घ्या सविस्तर…

श्रावण महिन्यात Trimbakeshwar मंदिरात दर्शनासाठी जायचं? तर ही बातमी नक्की वाचा…

भारताबद्दल खरा अभिमान हा नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करणाऱ्यांनाचं…, उदय सामंत

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version