वाढत्या कोरोना संसर्गातही चीन हटवणार निर्बंध, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ८ जानेवारीपासून खुल्या करणार सीमा

२०२० पासून सुमारे ३ वर्षांनी चीनला आंतरराष्ट्रीय क्वारंटाईन नियमांतून सूट मिळणार आहे. यापूर्वी चीनने डिसेंबरमध्येच वादग्रस्त कोविड धोरण मागे घेण्याची घोषणा केली होती.

वाढत्या कोरोना संसर्गातही चीन हटवणार निर्बंध, आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ८ जानेवारीपासून खुल्या करणार सीमा

चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात आले आहेत. चीनने ८ जानेवारीपासून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमधून सूट जाहीर केली आहे. एवढेच नाही तर चीन आपल्या आंतरराष्ट्रीय सीमाही उघडणार आहे. २०२० पासून सुमारे ३ वर्षांनी चीनला आंतरराष्ट्रीय क्वारंटाईन नियमांतून सूट मिळणार आहे. यापूर्वी चीनने डिसेंबरमध्येच वादग्रस्त कोविड धोरण मागे घेण्याची घोषणा केली होती. याला मोठा विरोध झाला. चीनमध्ये कोविड धोरण मागे घेतल्यानंतर प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

प्रचंड विरोधामुळे चीनने नोव्हेंबरमध्ये वादग्रस्त शून्य कोविड धोरण मागे घेतले होते. तेव्हापासून चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बीजिंगमध्येही परिस्थिती वाईट आहे. या सगळ्यात चीनने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वारंटाईनचे नियम बदलले आहेत. ८ जानेवारीपासून येथे येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जाणार नाही. सध्या चीनबाहेरून येणाऱ्या प्रवाशांना ५ दिवस हॉटेल्समध्ये तर तीन दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते.

चीनमध्ये २०२० पासून परदेशी प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा नियम होता. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे. ८ जानेवारीपासून कोणत्याही प्रवाशाला क्वारंटाईन केले जाणार नाही. चीनमध्ये येण्यापूर्वी प्रवाशांची कोरोना चाचणी करावी लागणार आहे. मात्र चाचणीचा अहवाल चिनी दूतावासाला सादर करावा लागणार नाही. त्याऐवजी फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी फक्त चाचणी अहवाल दाखवावा लागेल.

चीनने आंतरराष्ट्रीय सीमा उघडण्याचा निर्णय घेतला

एवढेच नाही तर चीनने आपल्या सीमा खुल्या करण्याचा निर्णय घेतला आहे. आता चीनमध्ये रस्ते आणि पाण्याच्या मार्गाने येण्यावरील बंदी हटवली जाणार असून हळूहळू प्रवाशांची ये-जा सुरू होणार आहे.एवढेच नाही तर परदेशातून काम, व्यवसाय, अभ्यास किंवा कुटुंबात परतणाऱ्या प्रवाशांसाठी ही व्यवस्था अधिक चांगली करून त्यांना पुन्हा व्हिसा दिला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरून बंदी हटवली जाईल

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीनमध्ये फाइव्ह वन धोरण लागू केले जात होते. यानुसार प्रत्येक परदेशी विमान कंपनी चीनमध्ये फक्त एकच हवाई मार्ग अवलंबेल आणि आठवड्यातून एक उड्डाण चालवेल. यामध्येही प्रवाशांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. पण आता चीनने हे धोरणही संपवण्याची घोषणा केली आहे. तथापि, फ्लाइटमधील प्रवाशांना मास्कसह इतर कोरोना नियमांचे पालन करावे लागेल.

चीनमध्ये कोरोना आता ‘गंभीर आजार’ राहिलेला नाही

कोरोनाला तोंड देण्यासाठी चीन प्रशासनाने रणनीती आखली आहे. आता चीनने कोरोनाला वर्ग बी आजाराच्या श्रेणी ठेवले आहे. डेंग्यू तापा सारखे कमी कमी तीव्र आजार या वर्गात ठेवले जातात इतकच नाही तर चीनमध्ये आता कोरून आलाय निमोनिया नसून संसर्ग म्हटलं जाणार आहे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की रोगाची सध्याची धोक्याची पातळी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे

कोविडशी आकडेवारी जाहीर केली जाणार नाही

यापूर्वी रविवारी आंतरराष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले होते की त्यापुढे कोबडीचे आकडेवारी जाहीर करणार नाहीत आयोगाकडून असे सांगण्यात आले आहे की आता कोरोनाशी संबंधित डेटा चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन द्वारे जारी केला जाईल तथापि सीडीसी किती वेळा डेटा जारी करेल हे सांगितले गेले नाही सीडीसी चीनमध्ये कमी संसर्गाचे व्यवस्थापन करते

हे ही वाचा:

PM Modiचे भाऊ प्रवास करत असलेल्या कारचा मोठा अपघात, अपघातात प्रल्हाद मोदी गंभीर जखमी

Nasal Vaccine नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोनाच्या ‘नेझल लसी’ची किंमत जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version